राज्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचार सभांचा जोर शिगेला पोहोचला आहे. राज्यात चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, अंतिम पाचव्या टप्प्यातील प्रचार सभा चालू आहेत. भारताची आर्थिक राजधानी असेलल्या मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत महायुतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी जीव गेला तरी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा शिवसैनिक काँग्रेसला (Congress) मतदान करणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्ला चढवला. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : इगो मीडिया कंपनीत बड्या राजकीय नेत्यांची गुंतवणूक; भिंडेच्या चौकशीत होणार नावे उघड)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, शिवाजी पार्क मैदानात ‘गर्व से कहो हम हिंदू’ ही डरकाळी घुमत होती, पण आता उबाठाला हिंदू म्हणायची लाज वाटू लागली आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे, मतांसाठी लाचारी सुरू असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. माणूस किती बदलला हे पाहू शकतो, पण इतक्या वेगाने रंग बदलताना सरडा पाहिला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे हे रंग बदलणारे सरडा असल्याची एकनाथ शिंदे यांनी जहरी टीका केली. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – BJP उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड)
उद्धव ठाकरे संपत्तीचे वारसदार असले तरी, आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवेत, तीच आमची संपत्ती असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या पाच वर्षात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या १० वर्षात एकही सुट्टी घेतली नसल्याचे ते म्हणाले. मोदींनी जीवन आपल्या देशाला समर्पित केलं असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. जगभरात देशाचे नाव झाले आहे. जगभरातील नेते मोदींची स्वाक्षरी घेतात, त्यांच्यासोबत फोटो काढतात, त्यांचा आदर करतात, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. (CM Eknath Shinde)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community