‘तुम्ही शस्त्रे टाका, मुख्य प्रवाहात या’ केंद्रिय गृहमंत्री Amit Shah यांचे नक्षलवाद्यांना आवाहन

199
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी 05 एप्रिलला दंतेवाडा (Dantewada) येथे आयोजित राज्य सरकारच्या ‘बस्तर पांडुम’ महोत्सवाच्या (Bastar Pandum Festival) समारोप समारंभाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, छत्तीसगडमधील (Bastar Tribal Area of ​​Chhattisgarh) बस्तर प्रदेशातील आदिवासींचा विकास नक्षलवादी (Naxalite) रोखू शकणार नाहीत. यावेळी केंद्रीय मंत्री शाह यांनी नक्षलवाद्यांना शस्त्रे समर्पण करण्याचे आवाहनही केले आहे.  (Amit Shah)
शाह म्हणाले – नक्षलवादी मारला गेल्यावर कोणीही आनंदी होत नाही

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, ‘बस्तरमध्ये जेव्हा गोळ्या चालत होत्या आणि बॉम्ब फुटत होते, ते दिवस आता संपले आहेत. मी नक्षलवादी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील व्हावे. तुम्ही आमचेच आहात. जेव्हा नक्षलवादी मारला जातो, तेव्हा कोणीही आनंदी होत नाही. फक्त तुमची शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील व्हा. तुम्ही शस्त्रे उचलून तुमच्या आदिवासी बंधू आणि भगिनींच्या विकासाला रोखू शकत नाही.’ तसेच
पुढील वर्षी मार्चपर्यंत संपूर्ण देश लाल दहशतीपासून मुक्त करण्याचं काम भाजपा सरकार (BJP Govt) करेल असा निर्वाणीचा इशाराही अमित शाह यांनी दिला आहे.
(हेही वाचा – Jail : बंदिजनांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट; कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी)

शाह पुढे म्हणाले की, विकास प्रक्रियेचा भाग बनणाऱ्या आत्मसमर्पण करणाऱ्या अतिरेक्यांना केंद्र आणि राज्य सरकारांकडून पूर्ण सुरक्षा मिळेल. ‘या भागाला विकासाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वर्षांत बस्तरला सर्वकाही देऊ इच्छितात. बस्तरने 50 वर्षांत विकास पाहिला नाही. मात्र, जेव्हा मुले शाळेत जातील, तालुक्यात आरोग्य सुविधा असतील, तेव्हाच हे शक्य आहे. प्रत्येकाकडे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आरोग्य विमा असला पाहिजे.’ असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.  

3 महिन्यांत 521 जणांचे आत्मसमर्पण

तसेच ‘2025 मध्ये आतापर्यंत एकूण 521 नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकली आहेत, तर 2024 मध्ये 881 जणांनी आत्मसमर्पण केले आहे. ज्या नक्षलवाद्यांनी हे समजून घेतले आहे की विकासासाठी शस्त्रे, आयईडी आणि ग्रेनेडची गरज नाही, तर पेन आणि संगणकाची गरज आहे.

(हेही वाचा – Kokan Properties : ‘कोकणात घर गुंतवणूक नव्हे गरज’; मुंबईत ‘कोकण प्रॉपर्टीज’ प्रदर्शनाला मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद)

बस्तर पंडुम महोत्सवाची प्रशंसा करताना शाह म्हणाले की, पुढच्या वर्षी हा महोत्सव राष्ट्रीय स्तरावर आयोजित केला जाईल. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना उद्घाटन समारंभात सहभागी होऊन आदिवासी बंधू आणि भगिनींना आशीर्वाद देण्याची विनंती करतील. 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.