‘ट्विटर’वर सुसाईड नोट! ओबामासह बॉलिवूड कलाकारांना टॅग केले आणि काय घडले?

102

मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल सांभाळणाऱ्या टीमने सायबर पोलिसांच्या मदतीने एका तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त केले. पोलिसांनी तत्परता दाखवत या तरुणाचे प्राण तर वाचवले, मात्र त्याने जे दोन पानी पत्र ट्विटरवर टाकून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासह बॉलिवूडचे काही अभिनेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग केल्यामुळे त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

घरभाड्याचा चेक वटणार नाही, या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न

विरार येथे राहणारा तरुण याने लॉकडाऊनचे कारण पुढे करून नोकरी गेल्यामुळे कर्जबाजारी झाला असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच घराचे भाडे थकल्यामुळे जवळ असलेले कंपनीचे ३७ हजार रुपये घराचे भाडे भरण्यासाठी वापरले. कंपनीने आपल्याकडून चेक लिहून घेतला आहे, परंतु बँक खात्यात पैसे नसल्यामुळे कंपनीने चेक टाकला, तर तो वटणार नाही आणि कंपनीचे मालक आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल करतील, माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे सांगत मी आयुष्य संपवत आहे, असे पत्रात लिहून या तरुणाने हे दोन पानी पत्र ट्विटर वर टाकले व मुंबई पोलिस, पोलिस आयुक्त, बॉलिवूड अभिनेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना तर टॅग केलेच, त्या शिवाय अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांना सुद्धा टॅग करून मदत करा, असे म्हटले होते. हे दोन पानी पत्र या तरुणाने इंग्रजीमध्ये लिहिले होते.

(हेही वाचा नगरसेवकांची संख्या वाढवण्यामागे सरकारमधील पक्षांची ‘सोय’! सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप)

मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने तात्काळ सायबर पोलिसांच्या मदतीने या तरुणाचा शोध घेऊन त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. परंतु त्याने लिहिलेले पत्र, मदतीची याचना, बराक ओबामासह बॉलिवूड अभिनेत्यांना टॅग करण्यामागे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कदाचित या तरुणाला स्वतःची आर्थिक बाजू स्थिर करण्यासाठी आणि कर्जातून बाहेर निघण्यासाठी या पद्धतीने पत्र टॅग करून मदतीची याचना केली असावी जेणेकरून या बड्या मंडळींकडून त्याला सहानुभूती आणि आर्थिक मदत मिळावी असा हेतू असावा, अशी माहिती शक्यता एका अधिकाऱ्याने वर्तवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.