इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची निदर्शने!

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने देशातील जनता हवालदिल झाली आहे. सामन्य माणसाचे कौंटुबिक बजेटच ढासालळे आहे व केंद्रातील मोदी सरकारला याबाबत काहीच वाटत नाही, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. 

पेट्रोल-डिझेल दरामध्ये होत असलेल्या दैनंदिन व सातत्याच्या दरवाढी विरोधात पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने पिंपरी चौकातील एच.पी.पेट्रोल पंपाजवळ केंद्रातील भाजपा सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाद्वारे हातात निषेध फलक, युवक काँग्रेसचे झेंडे व घोषणा देत मोदी सरकारचा खोटी आश्वासने देऊन देशाची फसवणूक केल्याबाबत जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी, बीत गये अब कितने दिन कब आयेंगेअच्छे दिन ! मोदी सरकार मुर्दाबाद ! भाजपा सरकार मुर्दाबाद !पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या ! अशा घोषणा देण्यात आल्या.

(हेही वाचा : तर मग काँग्रेसने केंद्रातही स्वबळावर येऊन दाखवावे! संजय राऊतांच्या टोला )

मोदी सरकार फसवे, खोटे, भ्रष्टाचारी, असंवेदनशील व विश्वासघाती!

यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने देशातील जनता हवालदिल झाली आहे. सामन्य माणसाचे कौंटुबिक बजेटच ढासालळे आहे व केंद्रातील मोदी सरकारला याबाबत काहीच वाटत नाही. यावरून त्यांचा सत्तेचा मस्तवालपणा व जनतेबद्दलची अनास्था स्पष्ट दिसून येते. सत्तेत येताना महागाई कमी करण्याचे वचन दिलेले मोदी सरकार यावर आज काहीच बोलत नाही, हेच का तुमचे अच्छे दिन? असा प्रश्न व त्याचे उत्तर ही जनतेला आता मिळाले आहे व हे मोदी सरकार फसवे, खोटे, भ्रष्टाचारी, असंवेदनशील व विश्वासघाती ठरले आहे, असे बनसोडे म्हणाले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, कौस्तुभ नवले, पिंपरी चिचंवड काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यू.आय.चे उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here