भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवा पर्यटन मंडळ स्थापना करण्यात येणार आहे. देशातील पर्यटन, समृध्द वारसा व संस्कृती यांचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशाची प्रसिध्दी करतील अशा युवा राजदूतांना घडविण्यासाठी युवा पर्यटन मंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. यातून विदयार्थी व तरुणांमध्ये संघभावना, व्यवस्थापन नेतृत्व आणि सेवा यासारखी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करण्याची वृत्ती तसेच शाश्वत व जबाबदार पर्यटनाची जागृती निर्माण करण्यास सहाय्य होईल.
(हेही वाचा – Heavy Rain : शहरात मुसळधार पाऊस; मच्छिमारांसाठी धोक्याची सूचना)
स्वातत्र्यांचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा/कनिष्ठ महाविदयालये आणि विदयालयांमध्ये इयत्ता सातवी पासून पुढील वर्गातील विदयार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळाची स्थापना होणार आहे. युवा पर्यटनमंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान म्हणून सन 2023-2024 या वित्तीय वर्षांमध्ये शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी रु. 10 हजार व महाविदयालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी रु.25 हजार असे अनुदान “प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा/महाविदयालयांना देण्यात येईल.
राज्यातील मान्यता प्राप्त शाळांमध्ये युवा पर्यटन मंडळाची स्थापना करणे व त्याअंतर्गत पर्यटन, प्रसिध्दी विविध उपक्रम राबविण्यासाठी ‘युवा पर्यटन मंडळाची’ स्थापना करण्यासाठी पर्यटन संचालनालय विभागीय कार्यालय, पुणे यांनी आवाहन केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. दुरध्वनी क्रमांक- 020-29900289 /8080035134 तसेच, केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर https://tourism.gov.in/whats-new/yuva-tourism-club माहिती घेण्यात यावी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community