-
जयेश शत्रुघ्न मेस्त्री
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) अतिशय गलिच्छ शेरेबाजी केल्यानंतर आता भाडिपाचा सारंग साठे चर्चेत आला आहे. स्टॅंड अप कॉमेडीच्या नावाखाली ही मंडळी जो काही दळभद्रीपणा करत असतात, त्याने लोक आधीच वैतागले होते. त्यात सारंगने आता कळस गाठला आहे. ‘मंदिर वही बनाएंगे’ यावर अफझल गुरुच्या चेहऱ्याशी साम्य असणाऱ्या सारंग साठेने शेरेबाजी केली आहे. त्यामुळे अनेक हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत. ‘मंदिर वही बनाएंगे’ हा एक मंत्र होता. हा मंत्र उच्चारत अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. हिंदुंच्या भावनांची खिल्ली उडवणाऱ्या आणि त्यास विनोद म्हणवणाऱ्यांच्या पूर्वजांनी भगवान श्रीरामांचे मंदिर पाडून तिथे बाबरी मशीद उभारली. हिंदुंना त्यांच्याच देशात त्यांच्याच देवाचे मंदिर परत मिळवण्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. राम मंदिर पुनर्निमाणाच्या कथा वाचल्या, ऐकल्या तर आपल्या डोळ्यांतून गंगा वाहू लागते. (Ranveer Allahbadia)
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे राहिले आहे आणि केवळ देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या हिंदुंनाही प्रचंड आनंद झाला आहे. मंदिरे आणि स्मारके पाडणाऱ्या वाळवंटी विकृतीला जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या संस्कृतीने दिलेले हे उत्तर होते की तुम्ही कितीही मंदिरे पाडली तरी आम्ही तुम्हाला जुमानत नाही व आम्ही जोडण्याची आणि उभारण्याची संस्कृती पुढे घेऊन जात राहणार आहोत. त्यामुळे ‘मंदिर वही बनाएंगे’ हा मंत्र विनोदाचा विषय होऊच शकत नाही. हा मंत्र ऐकल्यावर किंवा उच्चारताना ज्याच्या काळजात भक्ती, करुणा, प्रेम असे भाव निर्माण होत नाहीत, उलट त्यावर फालतू विनोद करावासा वाटतो, तो कलाकार काय माणूस होण्याच्याही लायकीचा नसतो. ‘टवाळा आवडे विनोद’ हे खडे बोल समर्थांनी या लोकांसाठीच लगावून ठेवले आहेत असे वाटते. कारण समर्थांना माहिती होतं की पुढे जाऊन अशी टवाळ कार्टी निर्माण होणार आहेत. विनोद या शब्दाचाच विनोद करणाऱ्या लोकांमुळे समाजातील वातावरण बिघडत चाललं आहे. (Ranveer Allahbadia)
(हेही वाचा – कोल्हापुरात GBS चा दुसरा बळी; राज्यातील रुग्णांचा आकडा १२ वर)
मान्य आहे की जसंजसं जग पुढे जातं तसतशी भाषा शैलीत आणि जीवनशैलीत बदल होत जातो. जे शब्द काही वर्षांपूर्वी सेन्सॉर्ड होते, ते आता मोकळेपणाने बोलले जातात. जुनं ते सोनं असं म्हणणाऱ्यातली आमची पिढी नाही. आम्हालाही नवीन गोष्टी हव्या आहेत, आम्हालाही ग्लॅमर आवडतो. विनोदावर आम्हीही मनसोक्त हसतो. पण शिव्या दिल्याशिवाय किंवा लोकांच्या भावनांना पायदळी तुडवल्याशिवाय विनोद निर्मिती करताच येत नाही, असा समज असणाऱ्यांचे काय करावे? हिंदुंच्या भावनांची खिल्ली उडवल्यामुळे नेटकरी सारंगवर प्रचंड संतापले असून त्याच्यावर अनेक शेरेबाजी करण्यात आली आहे. अनेक लोक त्याला सर तन से जुदा वाल्यांची खिल्ली उडवून दाखवण्याचे आव्हान देत आहेत. (Ranveer Allahbadia)
अर्थात त्या वाटेला तो जाणार नाही. कारण त्याला ठाऊक आहे की भारतामध्ये बहुसंख्य हिंदुंच्या भावना तुम्ही सहज पायदळी तुडवून ताठ मानेने जगू शकता. सारंगला त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल कोणताही खेद वा खंत नाही. उलट त्याच्यातला आगाऊपणाच अधिक प्रकर्षाने समोर आला आहे. वातावरण तापल्याने त्याचा ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ हा कार्यक्रम त्याने रद्द केला आहे. त्याबद्दल कारण देताना त्याने म्हटलंय की ‘व्हेलेंटाईन डे ला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो’ याचाच अर्थ त्याला त्याच्या वक्तव्याबद्दल पश्चाताप नाही. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हे चालायचेच. मात्र काही झाले तरी सारंगला स्वतःची चांगली पारख आहे. त्याने त्याच्याच व्यक्तिमत्वावरुन आपल्या कार्यक्रमाचं नाव ठेवलंय. ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’. खरोखरच अतिशय निर्लज्ज… (Ranveer Allahbadia)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community