मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकीकडे खरी शिवसेना कुणाची हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांची गळती मात्र थांबायचे नाव घेत नाही.
अशातच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी रायगडमध्ये उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला आहे. रायगड जिल्ह्यात नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या युवा सेना पदाधिका-यांमी अवघ्या दोन महिन्यांत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
या पदाधिका-यांनी केला प्रवेश
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या महाड येथील निवासस्थानी विकास गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. रायगड जिल्ह्यातील युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विपुल उभारे,महाड विधानसभा अध्यक्ष वैभव मोरे,विभाग प्रमुख योगेश बक्कम,सचिव जितेंद्र तेटगुरे या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
स्थानिक पातळीवर काम करण्यास अडचणी
उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही पण ठाकरेंची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडण्यास तयार नसल्याने आम्हाला स्थानिक पातळीवर काम करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आमच्यासोबत येणा-यांचा सन्मान करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया विकास गोगावले यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community