श्रीरामाची जन्मभूमी एकेकाळापासून मुसलमान आक्रमणकर्ता बाबरच्या नावाने ओळखली जाऊ लागली होती, मात्र मोदी सरकारच्या काळात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या वादावर निर्णय झाला आणि भव्य श्रीराम मंदिराची उभारणी सुरु झाली. मात्र त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतच (Ayodhya) मशीद उभारायला परवानगी दिली, त्यानुसार बाबरी मशीद बांधण्याचे कामही सुरु झाले, पण आता या मशिदीचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे बाबराच्या नामोनिशाण मिटणार आहे.
बाबराच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या या मशिदीला निधी कमी पडू लागल्याने अखेरीस मुस्लिम उलेमांनी त्या मशिदीचे नामांतर करायचा घाट घातला आहे. धन्नीपूर गावात उभी राहणारी मशिद आता मोहम्मद पैगंबर आणि त्यांचे वडील हजरत मोहम्मद बिन अब्दुल्ला यांच्या नावाने उभी राहणार आहे. याचा अर्थ भारताला गुलाम करणाऱ्या बाबराचे नाव इतिहासातून कायमचे पुसले जाणार आहे. अयोध्यातल्या (Ayodhya) श्रीराम जन्मभूमी मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी 2024 च्या अखेरीस रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिरात दर्शनाला सुरुवात देखील होईल. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धन्नीपूर गावात जी मशिद उभी राहणे अपेक्षित होते, तिचे काम मात्र पैशाअभावी आडून राहिले. अनेक मुस्लिम धनिकांनी सुरुवातीला मशिद बांधण्यासाठी पैसे देण्याचा वादा केला, पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही. अखेरीस मुस्लिम उलेमांची मुंबईत बैठक झाली आणि त्यामध्ये मशिदीचे नाव आणि डिझाईन दोन्ही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला ही मशीद आधुनिक रूप देऊन बांधण्यात येणार होती, पण आता या मशिदीला पारंपरिक घुमटाचेच डिझाईन देण्यात येणार असून तिचे नाव देखील हजरत मोहम्मद बिन अब्दुल्ला मशिद असे असणार आहे.
Join Our WhatsApp Community