आम्हाला फक्त काम करायचे आहे. पण कोणी थांबवल्यावर त्याला उत्तरही आम्हाला देता येते. माझ्यावर खूप अन्याय झाला आहे. आम्ही जनतेची कामे घेऊन वरिष्ठांकडे जायचो तेव्हा ‘ही मुख्यमंत्र्यांची जागा आहे’, असे सांगून काही करु नाही, असे सांगायचे. सिर्फ मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता, दिलो मे भी मोहब्बत होनी चाहिये, अशा शब्दांत आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी काँग्रेसला घराचा आहेर दिला.
२६व्या वर्षी मी आमदार झालो. पण काम करायची संधी मिळाली तेव्हा आम्ही पुढे आलो पण आम्हाला थांबवण्यात आलं. थांबवणारे आमच्या जवळपासच आहेत. कोणी काम थांबवले हे तुम्हालाही माहिती आहे. मी माझ्या नेत्यांकडे जायचो तेव्हा ते म्हणायचे की ही मुख्यमंत्र्यांची जागा आहे आपण काही करु शकणार नाही. त्यावेळी अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर अर्थमंत्री या नात्याने ते फोन करायचे आणि तेव्हा मला मतदारसंघासाठी निधी मिळायचा, असे आमदार सिद्दीकी (Zeeshan Siddique) म्हणाले.
(हेही वाचा Mamata Banerjee यांनी बलात्कारित पीडितांसाठी बनवले रेट कार्ड; बंगालमधील पीडित डॉक्टरच्या वकिलाचा गंभीर आरोप)
अजित पवारांचे केले कौतुक
काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी हे देखील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसपासून लांब असलेले आमदार झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या जनसन्मान यात्रेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही कौतुक केले. झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या वांद्रे पूर्व या मतदारसंघात या यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. जनसन्मान यात्रेच्या बॅनवर झिशान यांचा फोटो झळकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यानंतर सिद्दीकी हे अजित पवार यांच्यासोबत जनसन्मान यात्रेत सहभागी झाले. यावेळी बोलताना सिद्दीकी यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.
Join Our WhatsApp Community