Padma Awards 2025 करिता नामांकने सादर करण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख

186
Padma Awards 2025 करिता नामांकने सादर करण्याची 'ही' आहे अंतिम तारीख

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2025) घोषणा होत असते. ही प्रथा पुढे नेत यावर्षीही पद्म पुरस्कारांची नामांकने, केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्रक्रिया 1 मे 2024 पासून प्रारंभ झाली असून नामांकने सादर करण्याची अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठीची नामांकने (https://awards.gov.in) या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टवर ऑनलाईन सादर करता येतील.

पद्मविभूषण, पद्मभूषण, आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून, कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक सेवा, नागरी सेवा, व्यापार, औद्योगिकी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक भारतीय नागरिक, वंश, व्यवसाय, स्तर, किंवा लिंगाचा अपवाद न करता, या पुरस्कारांसाठी पात्र आहे. (Padma Awards 2025)

(हेही वाचा – कांदिवलीत Skill Development Training Center; येत्या तीन वर्षांत दहा हजार युवक युवतींना मिळणार प्रशिक्षण)

सर्व नागरिकांना स्वत:चे नामांकन करण्यासाठी आणि इतर योग्य व्यक्तींच्या शिफारसी सादर करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. विशेषत: स्त्रिया, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग, आणि नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या शोधासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही केले आहे.

नामांकने सादर करताना, व्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याची माहिती 800 शब्दांपर्यंतच्या वर्णनात नमूद करणे आवश्यक आहे. अधिक माहिती गृहमंत्रालयाच्या (https://mha.gov.in) या संकेतस्थळावर तसेच पद्म पुरस्काराच्या पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) उपलब्ध आहे. (Padma Awards 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.