Online Gaming च्या चिनी घोटाळ्याचा ईडीकडून पर्दाफाश!

भारतातून ४०० कोटी रुपये चिनी नागरिकांच्या खात्यात

47
Online Gaming च्या चिनी घोटाळ्याचा ईडीकडून पर्दाफाश!
Online Gaming च्या चिनी घोटाळ्याचा ईडीकडून पर्दाफाश!

भारतीय अर्थव्यवस्थेला ऑनलाईन गेमिंगद्वारे (Online Gaming ) खीळ बसवणाऱ्या चीनच्या कटाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) उधळून लावले आहे. तपास यंत्रणांनी चिनी नागरिकांकडून २५ कोटी रुपये जप्त केले असून, फिविन नामक गेमिंग अॅपद्वारे भारतातून ४०० कोटी रुपये चीनमध्ये (China) पोहोचल्याचे ईडीच्या तपासातून उघडकीस आले आहे. त्यामुळे काही चिनी नागरिकांची क्रिप्टो खाती ईडीने गोठवली आहेत. तसेच चीनचे हे गेमिंग अॅप भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान याप्रकरणाशी संबंधित पहिला गुन्हा ईडीने दि.१६ मे २०२३ रोजी कोलकाता (Kolkata) येथे दाखल केला होता. त्यानंतर ईडीने देशभर गेमिंग अॅपच्या (online gaming) विरोधात छापे टाकले होते. कोलकाता येथील प्रकरणात गेमर्सकडून गोळा केलेले पैसे एका व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. त्या बदल्यात अॅपमालक त्यांना रिचार्जसाठी कमिशन देत होता.

ओडीशाचे रहिवासी असणाऱ्या अरुण साहू आणि आलोक साहू असे रिचार्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. या दोघांच्या खात्यातील रक्कम क्रिप्टो चलनात (Crypto currency) रुपांतरीत करून नंतर ही रक्कम चिनी नागरिकांच्या वॉलेटमध्ये जमा करण्यात आली होती. यासाठी बिहारमधील पाटणा येथील अभियंता चेतन प्रकाश यांने संबंधितांना रुपयांचे रुपांतर क्रिप्टो करन्सीमध्ये (Crypto currency) करून देण्यासाठी मदत केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.