ऑपरेशन रक्षक मधील हुतात्मा प्रदीप मांदळे यांच्या कुटुंबियांना १ कोटी!

देशातील सुरक्षा संबंधी मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या राज्यातील सीमा सुरक्षा दल तसेच निमलष्करी दलातील सैनिकांच्या वारसांना एक कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

जम्मू काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये ऑपरेशन रक्षकमध्ये हुतात्मा झालेले हिंदुस्थानी लष्करातील जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील पळसखेड चक्का गावातील प्रदीप मांदळे हे हिंदुस्थानी लष्करात नायक पदावर होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ते हुतात्मा झाले होते. द्रास भागात लष्कराने ऑपरेशन रक्षक मोहीम राबवली होती. त्यावेळी गस्तीवर असताना हिमस्खलन होऊन प्रदीप मांदळे यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.

राज्य सरकारचा निर्णय

देशाच्या सीमांचे रक्षण करताना वीरमरण आल्यामुळे राज्य सरकारच्यावतीने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. युध्दात, युध्दजन्य परिस्थितीत तसेच देशातील सुरक्षेसंबंधी मोहिमेत, चकमकीत किंवा देशाबाहेरील मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या राज्यातील सैनिकांच्या वारसांना तसेच देशातील सुरक्षा संबंधी मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या राज्यातील सीमा सुरक्षा दल तसेच निमलष्करी दलातील सैनिकांच्या वारसांना एक कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्राचे सुपुत्र

भारतीय सैन्य दलात महार रेजिमेंटचे पराक्रमी जवान प्रदीप मांदळे यांना कर्तव्यावर असताना हौतात्म्य आले. जम्मू काश्मीरमधील द्रास टायगर हिल भागात ते आपलं कर्तव्य बजावत होते. तेथे १५ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री त्यांना वीरमरण आले. प्रदीप हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. वडिलांच्या मृत्यूनंतर प्रदीप हेच घरातील कर्त्या पुरुषाची भूमिका निभावत होते. त्यांच्या निधनाने केवळ मांदळे कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here