प्रसूतीदरम्यान 12 टक्के माता मृत्यू एकट्या भारतात

आई आणि नवजात बाळाचा जीव वाचवण्याबाबत देशभरात जागरुकता मोहीम सुरु असूनही भारतात गेल्या 23 वर्षांमध्ये 13 लाख गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये माता मृत्यूच्या प्रमाणाची राष्ट्रीय सरासरी 103 वर पोहोचली आहे. याचाच अर्थ प्रति एक लाख गर्भवती महिलांपैकी 103 महिलांचा जीव गेला आहे.

भारतामध्ये प्रसूतीदरम्यान, 12 टक्के महिलांचा मृत्यू झाला आहे. सरकारी योजनांना तितकेसे यश मिळत नसल्याने, गर्भवती महिलांच्या जीवाला धोका वाढत असल्याचे, यातून दिसून येते.

( हेही वाचा: पुण्यातील गणेश मंडळांचे ऐतिहासिक पाऊल! सात मंडळांचे बाप्पा एकाच रथात विराजमान होणार )

प्रत्येक दिवशी 800 महिलांचा मृत्यू

  • गर्भाशी संबंधित समस्यांमुळे जगभरात 2000 मध्ये 4 लाख 51 हजार महिलांचा मृत्यू झाला होता.
  • 2017 मध्ये 2 लाख 92 हजार महिलांचा मृत्यू झाला.
  • उत्तम उपचाराची सोय असतानाही, आज प्रत्येक दिवशी देशात तब्बल 800 महिलांचा मृत्यू होत आहे.
  • सर्वात जास्त मृत्यू हे आफ्रिकेच्या सब- सहारा, दक्षिण आशियाई देशांमध्ये होतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here