कोविड मृत्यू : १ लाख ७२७ नातेवाईकांच्या खात्यात प्रत्येकी ५० हजार!

94

कोविडमुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट वर्तीय नातेवाईकाला ५० हजार रुपयांचे सानुग्रह अन सहाय्य जाहीर करण्यात आले असून त्याअंतर्गत आजवर मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या १ लाख ७२७ निकट नातेवाईकांच्या बँक खात्यात आतापर्यंत ५०३ कोटी ६३ लाख रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाद्वारे मांडली आहे.

५० हजार रुपयांची आर्थिक मदत

मार्च २०२०मध्ये कोविडचा प्रादुर्भाव मुंबई, पुण्यासह राज्यभर पसरला. या जागतिक महामारीमध्ये अनेकांना कोरोनाची लागण होऊन त्यांना जीव गमावावे लागले. सन २०२१-२२मध्ये कोविड महामारी नियंत्रणासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ९०५ कोटी १९ लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आला. याअंतर्गत कोविड १९ साथरोगांमुळे आई वडिल गमावलेल्या मुला मुलींना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. कोविड कर्तव्यावर असतांना कोविडने मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते, असे यास अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नमुद केले.

( हेही वाचा : रविवारी बाहेर पडताय? जाणून घ्या कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक )

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सर्वसाधारण व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, १ लाख ७२७ मृतांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात आतापर्यंत ५०३ कोटी ६३ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे,असेही यामध्ये नमुद करण्यात आली आहे.

गरजू घटकांना आर्थिक तसेच अन्नधान्याची मदत

कोविड महामारीच्या काळात सरकारने बांधकाम कामगार, माथाडी कामगार, घरेलू कामगार, सुरक्षा रक्षक अशा एकूण १३ लाख ०३ हजार कामगारांना ७१५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिल्याचेही सरकारने अर्थसंकल्पात म्हटले आहे. याशिवाय ऑटो व सायकल रिक्षा चालक, छोटे व्यापारी, फेरीवाले आदी अनेक गरजू घटकांना आर्थिक तसेच अन्नधान्याची मदत केली आहे, असेही म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.