राज्यातील १ लाख कुटुंबे करत आहेत स्वयंवीजनिर्मिती; जाणून घ्या PM Suryagarh योजनेविषयी

117

एका महिन्यात तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या (Pradhan Mantri Surya Ghar Free Power Yojana) अंमलबजावणीत महावितरणने (Mahavitaran) बुधवारी एक लाख घरांचा टप्पा ओलांडला आहे.  घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात योजना सुरू करण्यात आली होती. (PM Suryagarh)

राज्यात २१ जानेवारीअखेर या योजनेतून एकूण १ लाख ७०० लाभार्थ्यांनी घरांवर सौर ऊर्जा (Solar energy) निर्मिती सुरू केली आहे. त्यामध्ये ग्राहकांना ७८३ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून ३९२ मेगावॅटची क्षमता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे २१ जानेवारी रोजी एका दिवसात १,१९५ घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

(हेही वाचा – Kailash Mansarovar Yatra पुन्हा सुरू होणार)

किती मिळते अनुदान ?

केंद्र सरकारकडून छतावरील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी साठ हजार रुपये तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. छतावर सौर पॅनेल बसवून या योजनेत वीज निर्माण केली जाते. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्याने वीजबिल शून्य होते. तसेच उत्पन्न मिळते. सौर पॅनेल बसविण्यासाठी केंद्राकडून तीन किलोवॅटला ७८ हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळते. अशी माहिती महावितरण अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी केले.  

मोफत नेट मीटर

१) प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

२) योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करून लाभ घेता येईल.

(हेही वाचा – Saif Ali Khan Attack : मी नोकरी आणि छोकरी गमावली, पोलिसांमुळे माझ्या जीवनात संकटे आली; कनोजियाचा आरोप)

घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविता यावा, यासाठी बँकांकडून माफत व्याजदरात कर्ज (Solar Power Loan)  उपलब्ध केले जात आहे, तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे.

पहिला नंबर कोणाचा? 

नागपूर – १६,९४९ 

पुणे – ७,९३१ 

जळगाव – ७,५१४ 

छ. संभाजीनगर ७,००८ 

नाशिक – ६,६२६ 

अमरावती – ५,७९५ 

कोल्हापूर –  ५,०२४

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.