Jalyukt Shivar Yojana ची १ लाख कामे अद्यापही कागदावर

91
Jalyukt Shivar Yojana ची १ लाख कामे अद्यापही कागदावर
Jalyukt Shivar Yojana ची १ लाख कामे अद्यापही कागदावर

संपूर्ण राज्यात पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या जलयुक्त शिवार योजनेस दुसऱ्या टप्प्यात म्हणावे तसे यश आले नाही. (Jalyukt Shivar Yojana) महाविकास आघाडी सरकारने योजना बंद करत झालेल्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्याचा फटका जलयुक्त शिवार योजना २ ला बसल्याचे चित्र आहे. कामे करून चौकशीच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा सावधगिरी बाळगत प्रशासनाने राज्यात फक्त ३० टक्के कामे पूर्ण केली आहेत. आराखडा मंजुरीस विलंब व आचारसंहिता ही कारणे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहेत.

(हेही वाचा – छत्रपती Sambhajinagar येथे ३० टन गोमांस जप्त)

आघाडी सरकारने बंद केलेली योजना शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केली. आराखडा तयार केला, पण प्रत्यक्षात या योजनेस प्रशासनाकडून म्हणावी तशी गती मिळाली नसल्याने आराखड्यात १ लाख कामे अद्यापही कागदावरच राहिली आहेत. आराखड्यात १ लाख ४८ हजार कामांसाठी ४२९७.२३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. २०२३-२४ या वर्षात ५५ हजार ८६ कामांवर ९७१ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. जलयुक्त शिवार योजना १ सन २०१५-१६ ते २०१८-१९ पर्यंत राबवण्यात आली. जलयुक्त शिवार-२ ला ३ जानेवारी २०२३ पासून राबवण्यास मंजुरी देण्यात आली होती.

कोणत्या विभागात किती काम पूर्ण ?
  • कोकण विभागात ९३७ गावांत १२३५९ कामांसाठी ४७९.४८ कोटींची तरतूद केली होती. यापैकी ३८९८ कामे पूर्ण झाली आहेत, तर १८९४ कामे सुरू आहेत. या कामांवर ६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  • पुणे विभागातील ८१५ गावांत १६ हजार ६९ कामे सुचवण्यात आली असून यासाठी ५३२.६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ९४२० कामे पूर्ण झाली असून २८७२ कामे प्रगतीपथावर आहेत.
  • छत्रपती संभाजीनगर विभागात ९७७ गावांमध्ये ३१ हजार १६० कामे सुचवण्यात आली असून यासाठी ८३५.२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २१ हजार ६८८ कामांना प्रशासकीय मान्यता दिली. १३१४७ कामे पूर्ण असून १४५९ कामे सुरू आहेत. या कामांवर १५२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. (Jalyukt Shivar Yojana )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.