Mantralaya : मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना १ महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण… 

पुणे जिल्ह्यातील भूसंपादन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणात शिक्षा

177
Mantralaya : मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना १ महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण... 
Mantralaya : मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना १ महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण... 

मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रालयातील (Mantralaya) ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी  न्यायालयाने अधिकाऱ्यांना १ महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये मदत आणि पुनर्वसन खात्याच्या सचिव असिम गुप्ता यांचा सहभाग असून त्यांच्यासह विजयसिंग देशमुख, उत्तम पाटील, प्रविण साळुंखे, तलाठी सचिन काळे यांना शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना ती भोगावी लागणार आहे.

(हेही वाचा – Mumbai University : दहावीच्या परिक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण : २५ विद्यार्थ्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलणार महापालिका)

पुणे जिल्ह्यातील भूसंपादन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणात त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र सरकारी पक्षाने माफी मागितल्यानंतर शिक्षेला आठवड्याची स्थगिती देण्यात आली आहे. शिक्षा रद्द करण्यास नकार देत न्यायालयाने प्रतिज्ञापत्र मागवले आहे. (Mantralaya)

या प्रकरणी आता ८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.