दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश पाकिस्तान आता स्वतःच दहशतवादाचा बळी ठरत आहे. दररोज कुठेतरी दहशतवादी हल्ले होतात आणि अनेक संघटना तेथील लष्कर आणि पोलीस तळांवर हल्ले करत आहेत. दरम्यान, भारताविरुद्ध विष उगारणारे आणि दहशतवादी कारवायांचा कट रचणारे इस्लामी चेहरेही तिथे मारले जात आहेत. भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी युनूस खान याची पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. (Terrorist Killed In Pakistan)
गेल्या तीन महिन्यांत भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेले असे ७ गुन्हेगार तिथे मारले गेले.जैश-ए-मोहंमदचा हा कमांडर तरुणांना फूस लावून दहशतवादी प्रशिक्षण देत होता. युनूस हा या महिन्यात अज्ञात हल्लेखोरांचा पाचवा बळी ठरला. १८ नोव्हेंबरला जैशचा दहशतवादी ताज मोहंमदही एका हल्ल्यात मारला गेला होता. (Terrorist Killed In Pakistan )
(हेही वाचा : Mumbai Police Bogus Call : मुंबईत दहशतवादी घुसल्याचे बोगस कॉल करणाऱ्या मद्यपीला अटक)
१२ नोव्हेंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी कराचीमध्ये जैश प्रमुख मौलाना मसूद अझहरचा जवळचा सहकारी मौलाना रहीमुल्ला तारिक याची गोळ्या झाडून हत्या केली होती. ९ नोव्हेंबर रोजी खैबर पख्तुनख्वा प्रांतात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अक्रम गाझी याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.असे वृत्त एका माध्यम समूहाने दिले आहे.
हेही पहा –