शेतकऱ्यांना १ हजार ९२७ कोटींची भरपाई; Dhananjay Munde यांची माहिती

39
शेतकऱ्यांना १ हजार ९२७ कोटींची भरपाई; Dhananjay Munde यांची माहिती
  • प्रतिनिधी

‘सर्वसमावेशक पीक योजने’ अंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे नाशिक, जळगावसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १ हजार ९२७ कोटी रुपये लवकरच मिळतील, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली. यापैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६५६ कोटी तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४७० कोटी रुपयांचे वाटप होणार आहे.

(हेही वाचा – Pollution : प्रदूषण जागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात शहाणपण देगा देवा मोहीम)

राज्यात बीड पॅटर्न आधारित पीक विमा योजना राबविण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या ११०% पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी ११०% पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते. तर त्यापुढील नुकसान भरपाई राज्य सरकार देते. या तत्त्वानुसार खरीप हंगाम २०२३ मधील मंजूर ७ हजार ६२१ कोटी रुपये पैकी विमा कंपनी मार्फत ५ हजार ४६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आले आहे. तर उर्वरित शिल्लक नुकसानभरपाई पैकी १ हजार ९२७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई प्रलंबित होती. ही मंजूर रक्कम वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली असून याबाबत ३० सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Solid Waste Management मधील पी. टी. केस प्रकरणांचा लावणार निकाल; गुरुवापासून दक्षिण मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी खास शिबिर)

ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली. शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई वाटप करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

(हेही वाचा – Nair Hospital चे डिन डॉ. मेढेकर यांची कुपरमध्ये बदली, नायरची जबाबदारी डॉ. शैलेश मोहितेंवर!)

सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नाशिक: ६५६ कोटी रुपये
जळगाव : ४७० कोटी रुपये
अहमदनगर : ७१३ कोटी रुपये
सोलापूर : २ कोटी ६६ लाख रुपये
सातारा: २७ कोटी ७३ लाख रुपये
चंद्रपूर : ५८ कोटी ९० लाख रुपये

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.