माटुंगा आणि मुंबादेवीत १ हजार वाहन क्षमतेचे रोबो पार्क

मुंबई महापालिकच्यावतीने वाहनतळाची (कार पार्किंग) सुविधा उपलब्ध असली तरी सध्याच्या एकूण ४५ हजार वाहनांची क्षमता असलेल्या वाहनतळाच्या तुलनेत वाहने उभी करण्यासाठी आवश्यक वाहनतळांची संख्या अपुरी आहे. मात्र, आता कमी जागेमध्ये अत्याधुनिक पध्दतीचे शटर आणि रोबो पार्क करता येतील अशाप्रकारच्या यांत्रिक वाहनतळाची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे महालक्ष्मी पाठोपाठ आता मुंबादेवी आणि मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकासमोरील जागेमध्ये सुमारे एक हजार वाहन क्षमतेची यांत्रिक वाहन बनवली जाणार आहेत.

( हेही वाचा : राज्यभरात धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, वारकरी महाअधिवेशनात ठराव संमत)

दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई मार्ग येथे असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील नुतनीकरण करण्यात आलेलया पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे लोकार्पण जून २०२१मध्ये करण्यात आले. या २१ मजली स्वयंचलित सार्वजनिक वाहनतळामध्ये २४० वाहनांची क्षमता असून मुंबईतील या पहिल्या रोबोटिक प्रणालीवर आधारीत महापालिकेच्या वाहनतळ निर्मितीनंतर आता माटुंगा पूर्व येथील रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेत तसेच मुंबादेवी मंदिराजवळील जागेत अशाप्रकारच्या स्वयंचलित यांत्रिक वाहनतळाची निर्मिती केली जात आहे. शटर आणि रोबो पार्क पध्दतीनुसार बांधण्यात येणाऱ्या या वाहनतळामध्ये माटुंगा पूर्व येथे ४७५ वाहन क्षमता आणि मुंबादेवी जवळील जागेमध्ये ५४६ क्षमता असेल. या दोन्ही ठिकाणी १८ मजल्याच्या वाहनतळाची उभारणी केली जाणार असल्याचे रस्ते(वाहतूक) विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अशाप्रकारे असेल रोबो पार्क वाहनतळाची रचना

एका बहुमजली वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर असणा-या एका भव्य पोलादी ‘प्लेट’ वर एक कार उभी केली जाते. कारची नोंद पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असणा-या रिसेप्शन काऊंटरवर संगणकीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर ज्या पोलादी प्लेटवर कार उभी असते, ती प्लेट स्वयंचलित पद्धतीने कारसह वाहनतळामध्ये प्रवेश करते. यानंतर तब्बल २१ मजली वाहनतळामध्ये असणा-या भव्य लिफ्टमध्ये ती कार स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाते. ज्यानंतर २१ मजल्यांपैकी ज्या मजल्यावर कार उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, त्या मजल्यावरील पार्किंगच्या ठिकाणी लिफ्ट स्वयंचलित पद्धतीनेच जाऊन ‘कार’ पार्क केली जाते. याचप्रकारे पार्किंगमधून कार बाहेर काढताना देखील रोबोटिक व स्वयंचलित पद्धतीनेच ‘कार’ बाहेर पडते.

माटुंगा पूर्व, मध्य रेल्वे स्थानकासमोर

  • प्रस्तावित वाहनतळाची क्षमता : ४७५
  • वाहतळाचे बांधकाम : १८ मजले

काळबादेवी, मुंबादेवी मंदिराजवळ

  • प्रस्तावित वाहनतळाची क्षमता : ५४६
  • वाहतळाचे बांधकाम : १८ मजले
  • वाहतळाचे बांधकाम : १८ मजले

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here