बापरे! पोटातून काढले १० कोटींचे कोकेन कॅप्सूल!

तब्बल ४८ तासांच्या अवधीनंतर एनसीबीला त्याच्या पोटातून ७० कॅप्सूल बाहेर काढण्यास यश आले.

128

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलेल्या मोझांबिक देशाच्या नागरिकाच्या पोटातून तब्बल १० कोटी रुपये किमतीचे ‘कोकेन’ या अमली पदार्थाने भरलेल्या ७० कॅप्सूल बाहेर काढण्यात एनसीबीला यश आले आहे. हे कॅप्सूल काढताना एक जरी कॅप्सूल या नागरिकांच्या पोटात फुटली असती, तर त्याचा जीवाला धोका निर्माण झाला असता, अशी माहिती एनसीबीने दिली आहे, त्यामुळे पूर्णपणे दक्षता घेऊन डॉक्टरांच्या मदतीने हि प्रक्रिया पार पाडण्यात आली असून कोकेनने भरलेलं कॅप्सूल काढण्यासाठी ४८ तासांपेक्षा अधिक वेळ लागला असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

अमली पदार्थाने भरलेले ७० कॅप्सूल गिळले

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी परदेशातून येणारा एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेऊन येणे असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई विभागाला मिळाली होती. दरम्यान एनसीबीने ८ ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावर सापळा रचून मोझांबिक देशाच्या नागरिक असलेल्या फुमो इमॅन्युएल झेडेक्विअस याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असताना त्याची त्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला ताबडतोब उपचारासाठी जेजे रुग्णालयात येथे आणण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासात त्याने कोकेन या अमली पदार्थाने भरलेले ७० कॅप्सूल गिळले असून हे कॅप्सूल तो दक्षिण अमेरिक येथून घेऊन आला होता अशी माहिती मिळाली.

(हेही वाचा : ब्रिटिशकालीन कायदे कायम असणे राष्ट्रासाठी घातक! अधिवक्ता अंकुर शर्मांचे मत)

४८ तासांनंतर त्याच्या पोटातून ७० कॅप्सूल बाहेर काढल्या!

एनसीबीने तात्काळ डॉक्टरांच्या मदतीने फुमो इमॅन्युएल झेडेक्विअस याच्या पोटातील कोकेनने भरलेले कॅप्सूल बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली. तब्बल ४८ तासांच्या अवधीनंतर एनसीबीला त्याच्या पोटातून ७० कॅप्सूल बाहेर काढण्यास यश आले. त्याच्या पोटातील सर्व कॅप्सूल बाहेर काढल्याची खात्री झाल्यानंतर एनसीबीने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या ७० कॅप्सूलमध्ये तब्बल १ किलो २९ ग्राम वजनाचे कोकेन हा अमली पदार्थ मिळून आला आहे. प्रत्येक कॅप्सूलमध्ये अंदाजे १४.७ ग्राम कोकेन भरण्यात आले होते, ड्रग्स तस्करांच्या पोटातून एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या कॅप्सूल मिळून येणे ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.