कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. यामध्ये अदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड या लसीचा खप खूप जास्त होता. पण कोरोनाचा धोका टळल्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसींना मिळणारा प्रतिसाद सुद्धा कमी झाला आहे. त्यामुळे सीरमने तब्बल 10 कोटी लसींचे डोस फेकून दिल्याची माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.
10 कोटी डोस गेले वाया
2022 मध्ये कोरोनाची लाट ओसरल्यामुळे बूस्टर डोस आणि कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला. त्यामुळे सीरमने डिसेंबर 2021 मध्ये कोविशील्ड लसीचे उत्पादन थांबवले होते. पण तरीही तयार केलेल्या लसी कालबाह्य झाल्याने कोविशील्डचे 10 कोटी डोस वाया गेल्याची माहिती पूनावाला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ओमायक्रॉनसाठी पण लस विकसित करणार
तसेच ओमायक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी अशी लस विकसित करण्याबाबत देखील पूनावाला यांनी माहिती दिली आहे. सीरम या लसीच्या निर्मितीसाठी अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्सशी भागीदारी करत आहे. तसेच सीरम सध्या अमेरिकन फार्मा कंपनी कोडाजेनिक्ससोबत सिंगल-डोस इंट्रानसल कोविड लसीवर देखील काम करत असल्याची माहिती पूनावाला यांनी यावेळी दिली आहे.
Join Our WhatsApp Community