होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वेवर धावणार आणखी १० विशेष गाड्या

114

होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि पनवेल-छापरा दरम्यान आणखी १० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : अंगणवाडी सेविकांना दिलासा! मानधनात १५०० रुपयांची वाढ, पेन्शन योजनाही होणार लागू)

विशेष गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे…

१. मुंबई-गोरखपूर एसी स्पेशल (४ सेवा)

  • गाडी क्र. ०२५९८ एसी होळी स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ मार्च आणि १२ मार्च रोजी १२.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल.
  • गाडी क्र. ०२५९७ एसी होळी स्पेशल गोरखपूरहून ३ मार्च आणि १० मार्च रोजी २०.५५ वाजता सुटेल आणि तिसर्याु दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला ०७.२५ वाजता पोहोचेल.
  • थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, चित्रकूट धाम, बांदा, रगौल, भारवा सुमेरपूर, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाहनगर, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद
  • संरचना : चार द्वितीय वातानुकूलित, १४ तृतीय वातानुकूलित आणि दोन जनरेटर व्हॅन.

२ . पनवेल-छपरा स्पेशल (६ सेवा)

  • ०५१९४ विशेष गाडी ३ ते १७ मार्चपर्यंत दर शुक्रवारी २२.५० वाजता पनवेलहून सुटेल आणि तिसर्याप दिवशी ०८.५० वाजता छपरा येथे पोहोचेल.
  • ०५१९३ विशेष गाडी २ ते १६ मार्चपर्यंत दर गुरुवारी १५.२० वाजता छपरा येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी २१.०० वाजता पनवेलला पोहोचेल.
  • थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज जंक्शन, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर शहर आणि बलिया.
  • संरचना : दोन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणी दोन गार्डच्या ब्रेक व्हॅनसह.
  • आरक्षण : ट्रेन क्र.०५१९४ आणि ०२५९८ साठी विशेष शुल्कावर बुकिंग १ मार्च रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ऍप डाउनलोड करावे. असे आवाहन रेल्वेने केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.