IIT कडे केली पाठ, तरी जगात मान ताठ! मुकेश अंबानींसह देशातील १० गर्भश्रीमंतांची गोष्ट

117

सध्या देशातील नामांकीत कंपन्यांमध्ये नोकरीसाठी बुद्धिवंत तरुण रांगा लावून असतात, त्यातील बहुतांश विद्यार्थी हे आयआयटी या देशातील पहिल्या क्रमांकाच्या शैक्षणिक संस्थेतील पदवीधर असतात. परंतु या कंपन्यांच्या मालकांनी मात्र आयआयटीकडे पाठ फिरवली होती. अशा रीतीने या कंपन्यांच्या मालकांनी एक प्रकारे जीवनात यशस्वी होणे हे आयआयटीसारख्या संस्थांवर अवलंबून नसते, तर आपल्या मेहनतीवर अवलंबून असते, असे दाखवून दिले आहे.

नारायण मूर्ती 

इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती हे भारतातील एक श्रीमंत उद्योगपती आहेत. गरीब घरात जन्माला आलेले नारायण मूर्ती यांना चांगल्या शाळेत शिक्षण घेणे शक्य नव्हते. मूर्ती यांनी आयआयटीचे प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण केली होती, मात्र गरिबीमुळे मूर्ती आयआयटीमध्ये जाऊ शकले नाही. त्यांनी मैसूर येतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून शिक्षण पूर्ण केले. मूर्ती यांनी त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १० हजार रुपयांचे कर्ज घेऊन १९८१ मध्ये इन्फोसिस कंपनी सुरु केली. त्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमधून पद्व्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.

मुकेश अंबानी 

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशिया खंडातील दुसरे श्रीमंत उद्योगपती आहेत. पण ते आयआयटीमध्ये शिकले नाही. विशेष म्हणजे अंबानी यांनी आयआयटी प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण केली होती, त्यांनी आयआयटीमधून शिक्षण सुरूही केले मात्र मध्येच सोडून दिले आणि मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकलमधून शिक्षण पूर्ण केले.

शास्वत नाक्राणी 

भारतपे या डिजिटल पेमेंट ऍपचा सह संस्थापक शास्वत नाक्राणी या तरुण उद्योगपतीने वडिलांच्या भावनगर येथूल इन्स्टिट्यूटमधून शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी दिल्ली आयआयटीमधून शिक्षण सुरु केले आणि मध्येच सोडून दिले. त्यानंतर भारतपे हे डिजिटल पेमेंट ऍप सुरु केले. सर्वात तरुण उद्योगपती म्हणून त्यांचा २०२१ मध्ये गौरव करण्यात आला.

अझर इकुबल 

भारतातील इंग्लिश न्युज ऍपचे सह संस्थापक अझर इकुबल दिल्ली आयआयटीमध्ये शिकत होते, त्यांनी मध्येच तेथून शिक्षण सोडून दिले. त्यानंतर त्यांनी ऍप सुरु केले. त्यांना वर्ल्ड यंग इंटरप्रिनूर अवॉर्ड दिला. त्यांचा फोर्ब्स आशिया, फॉर्च्युन इंडिया, बिझनेस वर्ल्ड यामध्ये अग्रक्रम मिळवला होता.

पीयूष बन्सल 

इ कॉमर्स पोर्टल आयव्हीअर, लेन्स कार्टचे संस्थापक पीयूष बन्सल सध्या ६०० कोटीचे मालक आहेत. पीयूष बन्सल यांनी आयआयटीसाठी तयारी करत होते. मात्र ते गेलेच नाहीत, त्यांनी कॅनडा येथील मॅकगिलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवी पूर्ण केल्यावर त्यांनी इ पोर्टल सुरु केले.

(हेही वाचा माफीचा साक्षीदार झाल्याने सचिन वाझे सुटणार आणि अनिल देशमुख अडकणार का?)

डॉ. व्यंकटरमन रामकृष्णन 

डॉ. व्यंकटरमन रामकृष्णन हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ त्यांना २००९ सालचा नोबेल पुरस्कार मिळाला. ते आयआयटी प्रवेशपूर्व परीक्षा अनुत्तीर्ण झाले. त्यांनी बडोदा येथील महाराजा शिवाजीराव विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

सत्या नाडेला 

सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टमधील कार्यकारी अधिकारी आहेत. ते आयआयटीच्या प्रवेशपूर्व परीक्षा अनुत्तीर्ण झाले. त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिमधून पदवी मिळवली.

विनोद राय 

विनोद राय हे निवृत्त प्रशासकीय अधिकारी होते. ते केंद्रीय महालेखा परीक्षक होते. नुकतेच त्यांना युनिटी स्मॉल फायनान्स बॅंकचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. त्यांनी २जी घोटाळा, कोलगेट, कॉमनवेल्थ गेम घोटाळे बाहेर काढले. राय यांनी आयआयटी प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

डॉ. एम दामोदरन 

डॉ. दामोदरन हे सेक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे माजी अध्यक्ष होते, युटीआय आणि आयडीबीआय यांचे पुरस्कार त्यांना मिळाले. डॉ. दामोदरन यांनी आयआयटी मद्रासमधील अर्धवट राहिलेले शिक्षण दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केले.

राहुल यादव 

राहुल यादव हे मध्यमवर्गीय होते. हे हौसिंग डॉट कॉमचे संस्थापक आहेत. २००७मध्ये आयआयटी मुंबई येथून ते अर्धवट शिक्षण सोडून गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.