Post Office Scheme : केवळ ३९९ रुपयांमध्ये पोस्टाकडून मिळेल १० लाखांचा अपघाती विमा! जाणून घ्या संपूर्ण योजना

भारतीय पोस्ट विभागाने ग्राहकांना तात्काळ आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी विशेष योजना सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पोस्टाकडून वार्षिक ३९९ रुपयांमध्ये १० लाखांचा अपघाती विमा योजना सुरू करण्यात आल्यानंतर यासाठी अनेक नागरिकांनी नोंदणी केली. मात्र या योजनेत दिव्यांग, साहसी खेळातील खेळाडू, पोलीस तसेच लष्कर, नौदल, हवाई दलातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे पोस्टाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत दिव्यांग बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.

( हेही वाचा : पासपोर्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी! परीक्षेविना केली जाणार निवड; मिळेल भरगच्च पगार )

सरकारशी संलग्न असल्यामुळे सामान्य नागरिकांना पोस्टातील सगळे व्यवहार सुरक्षित मानले जातात. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पोस्टात गुंतवणूक करतात. काही दिवसांपूर्वी पोस्टाकडून अपघाती विमा पॉलिसी जाहीर करण्यात आली या पॉलिसीला सामान्य माणसांची पसंती मिळाली या पॉलिसीबाबत सोशल मिडीयावर सुद्धा सर्वत्र चर्चा आहे.

पोस्टाची अपघात विमा पॉलिसी कशी आहे?

  • फक्त ३९९ रुपयांमध्ये १८ ते ६५ वयोगटातील व्यक्तींना १० लाखांचा अपघाती विमा मिळणार आहे.
  • यात सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फरशीवरून पाय घसरून पडणे यांसह सर्व अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.
  • व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास थेट १० लाख रुपये नातेवाईकांना देण्यात येतील.
  • ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे.
  • प्रत्येक टपाल कार्यालयातंर्गत अटी व शर्तींसह तुम्हाला विमा संरक्षण देण्यात येईल. या योजनेची अधिक वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here