AC Local : मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! एसी लोकलच्या आणखी १० फेऱ्या वाढणार

एसी लोकलची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या आणखी दहा फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. साध्या लोकलच्या दहा फेऱ्या रद्द करून एसी लोकलच्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. एसी लोकलच्या फेऱ्या सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी चालवण्याचा प्रयत्न असल्याचे रेल्वेने सांगितले. खालील मार्गांवर एसी लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन आहे.

( हेही वाचा : Konkan Toll Update : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना बाप्पा पावला! टोलसंदर्भात मोठा निर्णय)

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT) – बदलापूर ( ४ फेऱ्या)
  • सीएसएमटी-ठाणे मार्गावर ( ४ फेऱ्या)
  • सीएसएमटी-कल्याण मार्गावर – ( २ फेऱ्या )

एसी लोकलच्या ६६ फेऱ्या 

सध्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळादरम्यान वातानुकूलित लोकल फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आहेत. मध्य रेल्वेवर दररोज लोकलच्या ५६ फेऱ्या होतात. यात लवकरच आणखी दहा वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची भर पडेल. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या ५६ वरून ६६ होणार आहेत.

साध्या लोकल फेऱ्या रद्द होणार

आता साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द केल्यावरच नवीन फेऱ्या वाढविणे शक्य आहे, म्हणूनच साध्या लोकल फेऱ्या रद्द करून त्याऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here