Uttar Pradesh मध्ये १० मुसलमानांनी केली घरवापसी

91

देवबंद (Deoband), उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथील योग साधना यशवीर आश्रमात देवबंद येथील १० मुसलमानांनी इस्लाम त्यागून सनातन धर्मात पुनर्प्रवेश केला. स्वामी यशवीर महाराजांकडून (Swami Yashveer Maharaj) शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर ते पुन्हा सनातन धर्मात (hinduism) आल्याचे घोषित करण्यात आले. यज्ञानंतर त्यांनी हिंदु नावेही धारण केली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी साधारणपणे ५० वर्षांपूर्वी काही कारणास्तव सनातन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता. (Uttar Pradesh)

(हेही वाचा – Waqf Amendment Bill : ‘वक्फ’ने केले विरोधकांना संभ्रमित!)

स्वामी यशवीर महाराज म्हणाले की, भारतात रहाणारे सर्व मुसलमान आधी हिंदूच होते. इस्लामच्या (Islam) शासन काळात त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार झाल्याने अथवा काही आमिषाला बळीपडून सनातन धर्म सोडला होता. आता देशात कसल्याही प्रकारचे भीतीचे वातावरण नाही. सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे अशा लोकांनी सनातन धर्मात पुनर्प्रवेश करावे, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदू धर्मात आल्यावर फेमिदा म्हणाली, आता माझे नाव राजकुमारी आहे. 50 वर्षांपूर्वी मी एक चूक केली होती. त्यानंतर आम्ही मुस्लिम बनलो. मला भाऊ नव्हता. आम्ही पाच बहिणी होतो. त्यामुळे ती सक्ती होती. मी एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले. आता मी माझ्या धर्माकडे परत आले आहे. मी आता खूप आनंदी आहे. (Uttar Pradesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.