मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यावरील न्यूमॅटिक झडपांच्या दुरुस्तीचे काम येत्या सोमवारी १७ मे रोजी हाती घेण्यात येणार आहे. हे काम शुक्रवारी २१ मे रोजी पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईतील पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
तातडीच्या दुरुस्ती कामामुळे होणार पाणीकपात
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातून पिसेमध्ये पाणी सोडले जाते. या पिसे बंधाऱ्यातून येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी आणून, तेथून शुध्द पाण्याचा पुरवठा केला जातो. पिसे बंधाऱ्याच्या झडपांच्या कामांचा प्रस्ताव मागील स्थायी समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केला. त्यानंतर या कामाचा कार्यादेश देत हे काम आता हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरील न्यूमॅटिक झडपांच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम येत्या १७ ते २१ मे २०२१ पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये सोमवारी १७ मे ते शुक्रवारी २१ या कालावधीत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः शौचालयाने उजळला परिसर!)
मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे. तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जलअभियंता व उपायुक्त अजय राठोर यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community