मेट्रोच्या ‘या’ कार्डावर १० टक्के सवलत; ३१ हजार प्रवाशांनी घेतला लाभ

84

मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. नागपूर मेट्रोने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महा मेट्रोच्या तिकीट दरात थेट १० टक्के सवलतीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यासाठी प्रवाशांना महाकार्डचा वापर करावा लागतो.

( हेही वाचा : FIFA 2022 : जपानने मॅचसोबत जिंकले संपूर्ण जगाचे मन! स्टेडियममध्ये दिला महत्त्वाचा संदेश; व्हिडिओ होतोय व्हायरल)

नागपूर मेट्रोच्या महाकार्डामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकांमध्ये खरेदी करता येते तसेच तिकिटांवर १० टक्के सवलत सुद्धा मिळते आतापर्यंत ३१ हजार प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे. मेट्रोने प्रवास करताना डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आतापर्यंत ३१ हजार ८८६ महाकार्डांची विक्री नागपूर मेट्रोमार्फत करण्यात आली आहे.

नागपूर मेट्रोच्या महाकार्डाची वैशिष्ट्ये

  • मेट्रो स्थानकांवर महाकार्ड उपलब्ध
  • या कार्डाद्वारे स्वाईप सुद्धा करते येते
  • इंटरनेट आणि मोबाईल व्यवहारांसाठी योग्य

मुंबई मेट्रोचे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ई- तिकीट

दरम्यान, मेट्रो १ ने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ई- तिकीट वितरित करण्याची प्रणाली सुरू केली आहे. यामागे तिकिटांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न आहे. प्रवाशांना मुंबई मेट्रो प्रशासनाच्या क्रमांकावर इंग्रजीत Hi असे टाइप करून पाठवताच त्यांना ओटीपी क्रमांक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मिळणार आहे. तिकीट खिडकीवर हा ओटीपी किंवा लिंकचा वापर करून रोख पैसे देताच व्हॉट्सअ‍ॅपवर ई-तिकीट येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.