मंगळवारपासून पुढील दहा दिवस मुंबईसह ठाणे, भिवंडीत दहा टक्के पाणीकपात

144

मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवारी १ नोव्हेंबर २०२२ रोजी हाती घेण्यात येणार आहे, हे काम गुरुवारी १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईसह मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या दुरुस्ती कामाच्या कारणास्तव मंगळवारी १ ते गुरुवारी १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुंबई महानगरात आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या जलअभियंता विभागाने स्पष्ट केले.

( हेही वाचा : पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत कार घुसली; ६ वारकऱ्यांचा मृत्यू)

या कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.