राज्य सरकारने आरोग्य विभागात मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील 10 हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. फेब्रुवारी-मार्च दरम्यान परीक्षा घेऊन या जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
असे आहे वेळापत्रक
1 ते 7 जानेवारी 2023 या काळात आरोग्य विभागातील भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 25 ते 30 जानेवारी या काळात इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात येईल. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आसून 25 आणि 26 मार्च 2023 साठी आरोग्य विभागातील विविध पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर 27 मार्च ते 27 एप्रिल या एका महिन्याच्या काळात उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी निर्णय
गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या विविध विभागांतील पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साडे अकरा लाख तरुण भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे तरुणांच्या या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community