महापालिकेचे कामगार करायला निघाले विक्रम… कसा ते जाणून घ्या

162

मुंबई महापालिका म्हटली म्हणजे झाडू मारणारे किंवा गटार साफ करणारे कामगार डोळ्यासमोर येतात. परंतु महापालिकेचे हे कामगार आणि अभियंते आहेत, म्हणून मुंबई शहर विकसित होऊन आपल्याला हव्या असलेल्या पायाभूत सेवा सुविधा मिळत आहेत. एरव्ही या कामगारांकडे आपला पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असला, तरी त्यांच्यातही एक कलाकार, गायक लपलेला आहे. महापालिकेतील असेच हे गायक एकत्र येत आपला छंद जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा छंद जोपासता, जोपासता आता ते ओ.एम.जी. बुक ऑफ रेकॉर्डस यामध्ये आपली नोंद करायला निघाले आहेत. येत्या शनिवारी हा अद्वितीय विक्रम मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालयातील मुख्य सभागृहात महापालिकेचे १०० गायक हे एकाच गीतकाराची १०० गाणी एकत्रपणे स्वतंत्रपणे सादर करत हा विक्रम नोंदवणार आहेत.

ओ.एम.जी. बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेद्वारे केली जाणार नोंद

मुंबई महापालिकेच्या कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्येही गायक दडला असून त्या सर्वांना सोनटक्के-गोवेकर अर्थात सोगोच्या बॅनरखाली एकत्र आणत त्यांची गायनाची कलाही जोपासण्याचा प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे. सफाई कामगारापासून ते प्रमुख अभियंतापर्यंतचे सर्व कर्मचारी एकाच व्यासपीठावर येत गाणी सादर करत आहेत. मुंबई महानगर पालिकेतील कर्मचारी हा एक वेगळ्याच तणावाखाली रात्रं-दिवस काम करीत असतो. नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याकरिता त्या तणावाचे निवारण होणे आवश्यक असते. महापालिकेच्या आभियांत्रिकी विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, जलअभियंता विभाग, लेखा विभाग, कर निर्धारण व संकलन विभाग, मालमत्ता विभाग, मलनि:सारण विभाग, सुरक्षा विभाग व इतर अनेक विभागांतील कर्मचारी आपापल्या पदाचा दुराभिमान न बाळगता एकत्र येऊन एक कार्यक्रम सादर करणार आहोत. यामध्ये गीतकार साहिर लुधयानवी यांची १०० एकल गाणी मुंबई महानगर पालिकेतील १०० कर्मचारी गायकांमार्फत गात हा अनोखा जगा वेगळा विक्रम केला जाणार आहे. हा एक अद्वितीय विक्रम होणार आहे. अशा प्रकारची कामगिरी आजवर कोणीही केलेली नाही. एका बॅनरमधील शंभर गायकांनी शंभर गाणी आणि त्याही एकाच गीतकारांची सादर करणे ही मोठा विक्रम आहे. ज्याचे निरीक्षण व नोंद ओ. एम. जी. बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेद्वारे केला जाणार आहे. ही एक नामांकीत संस्था आहे. जी जागतिक पातळीवर मोलाचे आणि अद्वितीय मानवी उपलब्धी कार्याची नोंद ठेवत असते.

(हेही वाचा गांधी-नेहरू यांची पत्रे हाच खरा माफीनामा! रणजित सावरकरांचा घणाघाती हल्ला)

साहिर लुधयानवी हे संगीत क्षेत्रातले एक नावाजलेले व्यक्तीमत्व

या कार्यक्रमाची रचना, संकल्पना आणि दिग्दर्शन करणारे शैलेंद्र सोनटक्के व उत्तम गोवेकर यांनी याबाबत बोलतांना, मुंबई महानगर पालिका कर्मचारी हे गीतकार साहिर लुधयानवी यांना अनोखी श्रध्दांजली वाहणार आहेत. साहिर लुधयानवी हे संगीत क्षेत्रातले एक नावाजलेले व्यक्तीमत्व, एक महान गीतकार आहेत, ज्यांना त्यांच्या शायरीचा सार्थ अभिमान होता. त्यांचा असा विश्वास होता की, गाणी त्यांच्या गीत लेखनामुळेच ऐकली जातात. याच कारणामुळे त्यांनी सर्वांशी लढा दिला आणि फक्त त्यांच्या मुळेच रेडीओवर गीतकाराच्या नावाची घोषणा होऊ लागली. या चित्रपटसृष्टी उद्योगामध्ये सर्व कलाकारांना चित्रपट व्यवस्थेसोबत सांभाळून, जमवून काम करावे लागते. पण हे चित्रपट उद्योग जगत मग साहिर यांच्याशी जमवून घेत होते.

संगीतमय श्रध्दांजली देण्यात येणार

अशा या महान गीतकाराला त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त “जिंदगी भर नहीं भूलेंगे वो साहिर के गीत” या कार्यक्रमात संगीतमय श्रध्दांजली देण्यात येणार आहे. ८ मार्च १९२० ही साहिर यांची जन्मतारीख आणि सन  २०२० हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होते.  परंतू कोविडमुळे आपण २०२० वर्षात काही करु शकलो नाही. मात्र आता ते जन्मशताब्दी वर्ष मुंबई महानगर पालिकतील कर्मचारी शनिवारी, ११ डिसेंबर २०२१ रोजी साजरा करणार आहेत. शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील मुख्य सभागृहात सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात भारतातील सर्वात सृजनशील आणि लोकमान्य गीतकार साहिर लुधयानवी यांची मधुर गाणी ही ओके ट्रॅकवर सो.गो. सांगितीक कुटुंबाच्या, मुंबई  महानगर पालिकेतील १०० गायकांमार्फत गायली जाणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.