‘आठवड्यातून रविवार आले ना रे तिनदा’, 100 कंपन्यांनी कर्मचा-यांना दिली आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी

154

गेल्या काही दिवसांपासून भारतात नवीन कामगार कायदे लागू करण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. हे कायदे लागू झाल्यास आठवड्यातून केवळ चारच दिवस काम करावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतच्या निर्णयाची भारतीयांना प्रतिक्षा असतानाच आता लंडनमध्ये मात्र चार दिवसांच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. लंडनमधील तब्बल 100 कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

आठवड्यातून 4 दिवस काम

कंपन्यांच्या या निर्णयाचा साधारण 2 हजार 600 कर्मचा-यांना फायदा होणार आहे. या 100 कंपन्यांमध्ये आघाडीच्या अॅटम बँक आणि अॅव्हिन या दोन कंपन्यांचा देखील समावेश आहे. अॅटम बँक ही लंडनमधील मान्यताप्राप्त बँक असून, अॅव्हिन ही जागतिक मार्केटिंग कंपनी आहे. या दोन कंपन्यांमध्ये प्रत्येकी 450 कर्मचारी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व कर्मचा-यांना कंपनीच्या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. 4 दिवस काम केले तरी पगारात कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः EPFO: पीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी, पेन्शनच्या नियमांमध्ये ‘हा’ बदल झाल्यास होणार मोठा फायदा)

मायक्रोसॉफ्टला झाला फायदा

या प्रकारच्या युक्तीचा मायक्रोसॉफ्ट या अमेरिकन कंपनीला मोठा फायदा झाला होता. मायक्रोसॉफ्टने जपान येथे 2019 मध्येच कर्मचा-यांना 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी देण्यास सुरुवात केली होती. या निर्णयामुळे मायक्रोसॉफ्टला चांगला फायदा झाला आणि कर्मचा-यांनी चांगले काम करुन कंपनीची उत्पादकता वाढवली. तसेच कर्मचा-यांचे सुट्ट्या घेण्याचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी झाले आणि 23 टक्के वीजेचा वापर देखील कमी झाला.

(हेही वाचाः आता ‘या’ कामांसाठी Birth Certificate अनिवार्य होणार, केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय)

त्यानंतर फ्रान्समध्ये देखील या मॉडेलचा काही कंपन्यांनी स्वीकार केला होता. या प्रयोगाच्या लंडनमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून चाचण्या करण्यात येत होत्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.