राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्यूनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मान्यता दिली.
यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्यूनंतर द्यायच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती, मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेसाठी १०० कोटी रूपयांचा निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीसांना होणार आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 29, 2022
प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजूरी
अशा एकरकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरता निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीत मान्यता दिली. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे.
( हेही वाचा: रिफायनरी प्रकल्पावरुन रत्नागिरीत घमासान! )
महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान
जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्रामपंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या अशासकीय संस्थेला आणि दै. ॲग्रोवनला आज ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात आज तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान समारंभाचे आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले.
Join Our WhatsApp Community