भंगार व्यापा-यांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा उघड

127

नाशिकमध्ये भंगार व्यापा-यांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा उघड झाला आहे. बनावट कागदपत्रांद्वारे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवत फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. कामगारांच्या नावे बनावट कंपन्या  दाखवून हा सगळा घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे.

मलिकांशी संबंधीत व्यवहारांशी चौकशी

काही दिवसांपूर्वीच भंगार व्यापा-यांवर रेड पडल्या होत्या. नवाब मलिक यांच्याशी संबंधीत काही व्यवहार झाले आहेत का? या संदर्भात चौकशी करण्यासाठी या भंगार व्यापा-यांवर रेड टाकल्या गेल्या. नाशिकमध्ये असणारा हा भंगार व्यवसाय कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय बनला आहे. चौधरी नामक व्यावसायाने हा घोटाळ केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांनी हा 100 कोटींचा घोटाळा केल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा: १२८ चाकी ट्रक आला आणि पूल कोसळला )

लवकरच उलगडा होणार

कामगारांच्या नावे कंपन्या दाखवण्यात आल्या. पण प्रत्यक्षात मात्र या कंपन्या अस्तित्त्वात नाहीत. सध्या अटकपूर्व जामिनासाठी या व्यावसायिकांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप त्यांना अटक झालेली नाही. परंतु एक मोठा घोटाळा जीएसटीच्या माध्यमातून नाशिकमध्ये झाल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे आणि लवकरच पुढचे धागेदोरे समोर येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.