राज्यातील ‘हे’ १४ जिल्हे होणार निर्बंधमुक्त!

108

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत असताना राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधांसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे निर्बंधमुक्त करण्यात आल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणांत आल्याने आता केंद्र सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने इतर व्यवहारही सुरळीत व्हावे यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

नव्या नियमावली 4 मार्चपासून लागू

राज्यातल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून या जिल्ह्यांमध्ये होम डिलिव्हरी सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजर पार्क आदी ठिकाणांना देखील 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अ गटात नसलेल्या जिल्ह्यांसाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा असेल.जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी पूर्ण लसीकृत झालेल्या व्यक्तीला परवानगी असेल. पूर्ण लसीकृत नसलेल्या व्यक्तीला निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल प्रवासासाठी बंधनकारक असेल. खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या कार्यालयांना देखील पूर्ण क्षमतेनं काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या 14 जिल्ह्यांचा ‘अ’ श्रेणीत समावेश 

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ‘अ’ श्रेणीत समावेश करण्यात आलेल्या 14 जिल्ह्यांची यादी देण्यात आली आहे. अ श्रेणीतील जिल्ह्यांमध्ये सामाजिक, क्रीड, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा उत्सवाशी संबंधित कार्यक्रम संबंधित हॉल किंवा मैदानाच्या 50 टक्के क्षमतेनं घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये लग्न आणि अंत्यसंस्काराच्या विधीचा देखील समावेश आहे. या जिल्ह्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सरकारी विभाग वा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार हे वर्ग सुरू करता येतील. अंगणवाडी आणि शिशुगटांचे वर्ग देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हे आहेत ते 14 जिल्हे

  • मुंबई शहर
  • मुंबई उपनगर
  • पुणे
  • भंडारा
  • सिंधुदुर्ग
  • नागपूर
  • रायगड
  • वर्धा
  • रत्नागिरी
  • सातारा
  • सांगली
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • कोल्हापूर

(हेही वाचा – Russia Ukraine War: युद्धाने भारतीयाचं जगणं केलं मुश्कील!)

अशी आहे नवी नियमावली

  1. राज्यातील सर्व सरकारी, खासगी कार्यालयातील १०० टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  2. कोरोना लसीचे दोन डोस घेतले असेल तर चित्रपटगृहे , मॉल्स आणि इतर ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे.
  3. निर्बंधमुक्त जिल्ह्यात शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  4. रेल्वे किंवा बसने प्रवास करताना कोरोना लसीचे दोन डोस बंधनकारक
  5. मनोरंजन व उद्याने जलतरण तलाव, वॉटर पार्कही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याच्या परवानगी
  6. लग्नसमारंभासह अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले आहेत
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.