मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता शिवडी बस डेपोसमोर ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड असलेली ६०० मिलीमीटर आणि ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीची १५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड देण्याचे काम मंगळवार, दिनांक ७ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, दिनांक ८ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गांव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर तसेच ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्येही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर शहर उत्तर व दक्षिण परिसर पाणीपुरवठा विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
या कालावधीत पाणीकपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
( हेही वाचा : रेल्वेची नवी सुविधा: आता तुमचं स्टेशन आल्यावर रेल्वे करणार तुम्हाला ‘वेकअप काॅल’ )
कोणत्या भागाला कसा पडेल फरक
एफ/दक्षिण विभागः
१) रुग्णालय प्रभागः के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय आणि एम. जी. एम. रुग्णालय (२४ तास पाणीपुरवठा) – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सकाळी १० ते दिनांक ८.६.२०२२ रोजी सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
२) शिवडी (पूर्व) विभागः शिवडी फोर्ट मार्ग, गाडी अड्डा शिवडी कोळी वाडा – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
३) शिवडी (पश्चिम) विभागः आचार्य दोंदे मार्ग, टि. जे. मार्ग, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद (क्रॉस) मार्ग – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ७ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
४) गोलंजी हिल पाणीपुरवठा –
अ) परळ गांवः गं. द. आंबेकर मार्ग ५० टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गांव मार्ग, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड – (दिनांक ७.६.२०२२ रोजी दुपारी १.४५ ते सायंकाळी ४.४५ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
ब) काळेवाडीः परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग, मिंट कॉलनी, राम टेकडी
– (दिनांक ७.६.२०२२ रोजी रात्री ८.३० ते रात्री ११.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
क) नायगांवः जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये मार्केट, भोईवाडा गांव, हाफकिन – (दिनांक ८.६.२०२२ रोजी सकाळी ७ ते सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
५) अभ्युदय नगरः अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग – (दिनांक ७.६.२०२२ रोजी मध्यरात्रीनंतर २.१५ ते सकाळी ६ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
६) शिवडी वडाळा झोनः ज्ञानेश्वर नगर, जेरबाई वाडिया मार्ग – (दिनांक ८.६.२०२२ रोजी सकाळी ६.३० ते सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
७) शहर उत्तर पाणीपुरवठाः
दादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता – (दिनांक ८.६.२०२२ रोजी सकाळी ७ ते सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)
८) शहर दक्षिण पाणीपुरवठाः लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली – (दिनांक ८.६.२०२२ रोजी पहाटे ४ ते सकाळी ७ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)
ई विभाग (भायखळा)
अ. जे. जे. रुग्णालय (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)
ब. म्हातार पाखाडी – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सकाळी ६.४५ ते सकाळी ९ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
क. डॉकयार्ड रोड – (दिनांक ७.६.२०२२ रोजी दुपारी १२.३० ते दुपारी ३ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
ड. हाथी बाग हुसेन्नी पटेल मार्ग – (दिनांक ७.६.२०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
इ. रे रोड – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
फ. माऊंट रोड (घोडपदेव) – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
ग. बीपीटी – (दिनांक ७.६.२०२२ रोजी रात्री ९ वाजता- ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
ह. नेसबीट मार्ग, माझगांव – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
बी विभाग (वाडीबंदर, मस्जिद)
अ) संपूर्ण बी विभाग, बाबुला टँक क्षेत्रः
डोंगरी विभाग अ आणि ब – (दिनांक ७.६.२०२२ रोजी रात्री ८.३० ते रात्री १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
ब) वाडी बंदर– (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ५.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
क) मध्य रेल्वे – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
ड) बीपीटी विभाग – (दिनांक ७.६.२०२२ आणि दिनांक ८.६.२०२२ रोजी सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ५.३० वाजता आणि रात्री ११.३० ते मध्यरात्रीनंतर १ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
ए विभाग( कुलाबा, फोर्ट)
बी. पी. टी., नेव्हल डॉकयार्ड आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटल, रामगढ झोपडपट्टी, पी. डिमेलो मार्ग – (दिनांक ७.६.२०२२ रोजी दुपारी १.३० ते सायंकाळी ४ आणि रात्री ९.५० ते मध्यरात्री २.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
Join Our WhatsApp Community