Veer Sawarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी विशेष कारागृहातून मुक्त होण्याला 100 वर्षे पूर्ण, दूरदर्शनवर ‘हॅलो सह्याद्री’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

दूरदर्शनवर 'हॅलो सह्याद्री' कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

172
Veer Sawarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी विशेष कारागृहातून मुक्त होण्याला 100 वर्षे पूर्ण
Veer Sawarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी विशेष कारागृहातून मुक्त होण्याला 100 वर्षे पूर्ण

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि रत्नागिरीचे अतूट नाते आहे. देशप्रेमाच्या जाज्वल्ल्य भावनेने ओतप्रोत भरलेला कारावास, त्यानंतरची स्थानबद्धता, पतितपावन मंदिराची स्थापना यासारखी त्यांनी केलेली अजोड सामाजिक कामे रत्नागिरीला वेगळी ओळख निर्माण करून देणारी ठरली. १६ मे १९२१ ते ३ सप्टेंबर १९२३ या सव्वादोन वर्षांच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी इथल्या विशेष कारागृहात वास्तव्याला होते. ३ सप्टेंबर १९२३ या दिवशी वीर सावरकर या कारागृहातून मुक्त होऊन तब्बल १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आज सोमवारी, 4 सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ यादरम्यान ‘हॅलो सह्याद्री’ या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे.

वीर सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आणि त्यांच्या शिक्षेच्या कालावधीचा अंत सांगणाऱ्या या दिवसानिमित्त रत्नागिरी विशेष कारागृहाचे तुरुंग अधिकारी अमेय पोतदार या थेट प्रक्षेपणात सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी हॅलो सह्याद्री या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. क्रांतीसूर्य सावरकरांच्या स्मृती, त्यांनी केलेला खडतर संघर्ष, अंत:करणातील राष्ट्रभक्ती, रत्नागिरी वास्तव्यातील आठवणींचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांना विशेष डॉक्युमेंटरीसह पाहता येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.