एसटीच्या १ हजार बसगाड्यांचे सीएनजीमध्ये होणार रुपांतर

एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणाऱ्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपूरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे, असे प्रतिपादन मंत्री ॲड. परब यांनी केले आहे.

कोरोनामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाल्याने त्याचा उत्पन्नाला फटका बसला आहे. त्यातच डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या १७ हजार बसेस असून डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या ३४ टक्के इतका होता. वाढत्या डिझेल किमतीमुळे तो आता ३८ ते ४० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोझा पडत असल्यामुळे महामंडळ दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत अडकले जात आहे, त्यानुसार एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.

महामंडळाला १४० कोटी रूपये देणार

जसे शासकीय व खाजगी मालवाहतूक, शासकीय वाहनांची देखभाल दुरुस्ती, खाजगी बसची बांधणी, खाजगी वाहनांचे टायर पुन:स्तरीकरण इत्यादी. त्याच अनुषंगाने डिझेलवर होणाऱ्या कोट्यवधी रूपयांच्या खर्चाचा गांभीर्याने विचार करत डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी या पर्यायी इंधनावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी आवश्यक निधीसाठी महामंडळाने उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. रिट्रोफिटमेंटसाठी एकूण १४० कोटी रूपयांची मागणी महामंडळाने केली होती. महामंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२१-२०२२ च्या अंदाज पत्रकात या निधीची तरतूद केली आहे, असे ॲड. परब यांनी सांगितले. त्यानुसार डिझेलवर धावणाऱ्या एसटी बसेसचे सीएनजी वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणाऱ्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपूरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे, असे प्रतिपादन मंत्री ॲड. परब यांनी केले आहे.

(हेही वाचा : एसटीत आत्महत्येचे सत्र सुरूच! २३व्या आत्महत्येने महामंडळ हादरले!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here