किसान रेल्वेच्या 1 हजार फे-या! महाराष्ट्रातून किती कृषीमाल देशभरात पोहोचला?

96

नरेंद्र सिंह तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि अश्विनी वैष्णव, रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, भारत सरकार यांनी आज, गुरुवारी सावदा, महाराष्ट्र ते आदर्श नगर, दिल्ली येथे जाणाऱ्या मध्य रेल्वेवरील किसान रेल्वेच्या एक हजाराव्या फेरीला वेबलिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला. सावदा, महाराष्ट्र ते आदर्श नगर दिल्ली या ट्रेनला २३ डबे होते ज्यात ४५३ टन केळीची वाहतूक करण्यात आली होती. आतापर्यंत ३.४५ लाख शेतमालाची वाहतूक एक हजाराव्या किसान रेल्वेमध्ये मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.

१००व्या किसान रेलला पंतप्रधानांनी दाखवलेला झेंडा

या मेळाव्याला संबोधित करताना माननीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, आपला देश कृषिप्रधान आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. किसान रेलच्या माध्यमातून चांगली किंमत मिळण्यासाठी फळे आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूंची वाजवी दरात दूरच्या बाजारपेठेत वाहतूक ही अशीच एक योजना असल्याचे त्यांनी सांगितले. तोमर म्हणाले की, मध्य रेल्वेवरील किसान रेल्वेच्या एक हजाराव्या फेरीला हिरवा झेंडा दाखविण्याच्या या प्रसंगी उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे कारण पहिल्या किसान रेल आणि १००व्या किसान रेलला पंतप्रधान यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्याच्या प्रसंगी ते उपस्थित होते.

(हेही वाचा world cancer day 2022 : मागील तीन वर्षांत कर्करोगाने किती झाले मृत्यू?)

जळगावच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन

अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नेहमी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवतात आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध पावले उचलतात. किसान रेल हा असाच एक उपक्रम आहे, ज्याने शेतकर्यांना त्यांचे कृषी उत्पादन आर्थिकदृष्ट्या आणि त्वरीत दूरच्या बाजारपेठेत पोहोचवले जाते. जीआय टॅग मिळालेल्या जळगावच्या केळीचाही त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. त्यांनी जळगावच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करून पुढील सुधारणा करण्यासाठी काही सूचना असल्यास पुढे यावेत, असे आवाहन केले. रावसाहेब पाटील दानवे, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार आणि खासदार रक्षा खडसे यांनीही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी रेल्वेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.