100th Natya Sammelan : शंभराव्या नाट्य संमेलनाचा मान पिंपरी-चिंचवड शहराला

100th Natya Sammelan सहा-सात जानेवारीला सारस्वतांची मांदियाळी; शरद पवार स्वागताध्यक्ष, डॉ. जब्बार पटेल संमेलनाध्यक्ष 

319
100th Natya Sammelan : शंभराव्या नाट्य संमेलनाचा मान पिंपरी-चिंचवड शहराला
100th Natya Sammelan : शंभराव्या नाट्य संमेलनाचा मान पिंपरी-चिंचवड शहराला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे ऐतिहासिक नाट्य संमेलन (100th Natya Sammelan) ६ आणि ७ जानेवारी २०२४ असे दोन दिवस पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरांमध्ये होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष, तर स्वागत समिती अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) असतील, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

(हेही वाचा – Madrasa Funding : 80 मदरशांना 100 कोटी रुपयांहून अधिक फंडिंग; विशेष तपास पथकाच्या चौकशीत उघड)

पत्रकार परिषदेला अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजेशकुमार साकला, राजेंद्र बंग, संतोष रासने, संतोष शिंदे, प्रणव जोशी, गौरी लोंढे, हर्षवर्धन भोईर, आकाश थिटे आणि नाट्य परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडमध्ये शंभरावे नाट्य संमेलन होणे गौरवशाली

भाऊसाहेब भोईर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये शंभरावे नाट्य संमेलन (Natya Sammelan) होत आहे. ही अभिमानाची आणि शहराच्या दृष्टीने गौरवशाली बाब आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते ७९व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याच वेळी शंभरावे नाट्य संमेलन पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात व्हावे, ही अपेक्षा होती आणि त्याला स्वागताध्यक्ष म्हणून पवार यांना बोलवावे, अशी मनोमन इच्छा होती.

(हेही वाचा – Nawab Malik : नवाब मलिक अजित पवार गटात येताच मोहित कंबोज यांचे ट्विट; म्हणाले…)

सुसज्ज नाट्यसंकुल उभे करण्याचा प्रयत्न

योगायोगाने ही इच्छा पूर्ण होत आहे. २७ वर्षांच्या कालखंडात उदयोन्मुख कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यसंकुल उभे करता आले नाही, ही खंत आहे. मात्र नियोजित नाट्य संमेलनाच्या निमित्ताने ही उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. देणगी स्वरूपामध्ये आर्थिक मदत घेऊन शहरात सुसज्ज असे नाट्यसंकुल उभे करण्याचा संकल्प पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आहे, असेही भोईर यांनी सांगितले.

‘सांस्कृतिक शहर’ ओळख होण्यासाठी प्रयत्न

२७ वर्षांपूर्वी शहराची उद्योग नगरी अशी ओळख होती. स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ असावे, यासाठी जाणीवपूर्वक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून पिंपरी चिंचवडला (Pimpri Chinchwad) ‘सांस्कृतिक शहर’ अशी ओळख निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले गेले. गेल्या २७ वर्षांत मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरांमध्ये वेळोवेळी आपले कलागुण सादर केले. याचा मनस्वी आनंद आहे. तसेच मराठी नाट्य चित्रपट सृष्टीत स्थानिक कलावंतांनी आपली ओळख निर्माण केली, याचा मनस्वी आनंद आहे, असे कृष्णकुमार गोयल म्हणाले.

(हेही वाचा – Abhimanyu Easwaran : बंगालच्या अभिमन्यू ईश्वरनची मनिषा लवकरात लवकर भारतीय जर्सी परिधान करण्याची)

सांस्कृतिक पर्वणी

नाट्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी नाट्य स्पर्धेत गाजलेल्या विविध नाटकांचे प्रयोग प्रायोगिक नाटके, नाट्यछटा, एकपात्री प्रयोग, एकांकिका कीर्तन, लोककला, महाराष्ट्रात गाजलेल्या विविध लावणी सम्राज्ञींचा लावणी महोत्सव, संगीत व नृत्य विषयक कार्यक्रम बालनाट्य व संबंध महाराष्ट्रातील स्पर्धांमध्ये नावाजलेल्या उल्लेखनीय एकांकिका व नाटकांचे प्रयोग होणार आहेत. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरांमधील आबाल वृद्ध रसिकांसाठी ही एक सांस्कृतिक पर्वणी आहे असे भोईर यांनी सांगितले.

मुख्य संमेलन मोरया गोसावी क्रीडांगणावर, तर बालरंगभूमीसाठी विशेष व्यवस्था

मुख्य संमेलन मोरया गोसावी क्रीडांगण, काकडे पार्क, चिंचवडगाव येथे होणार असून भव्य नाट्यदिंडी आणि शोभायात्रेने संमेलनास सुरुवात होईल. नाट्यदिंडीमध्ये लोककलांचे सादरीकरण केले जाईल. नाट्य क्षेत्रामध्ये कार्यरत नाट्यकलावंतांचा सहभाग यामध्ये असेल. शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र मैदान भोईर नगर, चिंचवड येथील मैदानावर बालरंगभूमीद्वारे नाट्य सादरीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे, असे भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir) यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.