Gadchiroli : गडचिरोलीतील धक्कादायक घटना; शासकीय आश्रमशाळेतील 105 विद्यार्थ्यांनींना विषबाधा

203

गडचिरोली (Gadchiroli)  जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत तब्बल 105 विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून खळबळ माजली. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील 15 ते 20 मुलींना प्राथमिक उपचारानंतर सुटी दिली तर 73 विद्यार्थ्यांनींची प्रकृती गंभीर असल्यामुळे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत.

मुलींना उलट्या आणि हगवण सुरू झाली

सोडे येथील मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीनींनी दुपारी 12 वाजताच्या सुमारास बटाटा-कोबीची भाजी, वरण आणि भात असे जेवण देण्यात आले. हे जेवण जेवल्यानंतर काही वेळाने मुलींना उलट्या आणि हगवण सुरू झाली. सायंकाळपर्यंत 105 मुलींना विषबाधा झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवळजवळ 15 मुलींना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून 75 विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान शाळेतील भोजनाचे कंत्राट देण्यात आले असले तरी शाळेतील कर्मचारीच स्वयंपाकाचे काम करीत असल्याचे समजते. या संदर्भात मुख्याध्यापक मंडलवार यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचेशी संपर्क होऊ शकला नाही.

(हेही वाचा Amit Shah : दहशतवाद रोखण्यासाठी मानवाधिकाराचा युक्तीवाद आता ऐकू येणार नाही; अमित शाह यांचा कॉंग्रेसवर निशाणा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.