एसटी महामंडळातर्फे लवकरच १०५० कंत्राटी वाहक भरती

एसटी महामंडळाच्या पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांकरिता कंत्राटदारामार्फत १०५० वाहक पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी एसटी महामंडळ निवृत्त वाहकांची करणार आहे. राज्यात आता मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : बेस्टचे बंद केलेले बसमार्ग पुन्हा सुरु होणार?)

१०५० कंत्राटी वाहक भरती

  • तीन वर्षांसाठी वाहकरूपी कर्मचारी पुरवठा करावा लागणार असल्याचे निविदेत नमूद केले आहे.
  • यापूर्वी कंत्राटीपद्धतीने केलेली भरती ही एसटी महामंडळाने थेट स्वतः केली होती. यावेळी प्रथमच ती ठेकेदारामार्फत होणार आहे.
  • यातून एसटी महामंडळाचे खासगीकरण करून ते भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेने केला आहे.

या संदर्भात पुरोगामी युवक संघटनेचे इंजिनिअर अभिजित कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एकीकडे शासनात विलिनीकरणसाठी एसटी कर्मचारी संघर्ष करत असताना दुसरीकडे खासगीकरणाचा घाट सुरु असल्याचे हे विदारक चित्र आहे. महाराष्ट्रभर अशाच प्रकारे ठेकेदारामार्फत चालक पुरवले गेल्यास भविष्यात एसटी महामंडळ भांडवलदारांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याचा पुरोगामी युवक संघटना निषेध करत आहे. एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा डाव त्वरित थांबवावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here