Board Exams : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचे शुल्क वाढले, अर्ज भरण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

परीक्षेसाठी राज्यात साडेपाच हजारांपर्यंत केंद्रे असणार आहेत.

128
Board Exams : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचे शुल्क वाढले, अर्ज भरण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत
Board Exams : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचे शुल्क वाढले, अर्ज भरण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेला (Board Exams) फेब्रुवारी- मार्चमध्ये सुरुवात होणार आहे. कागदांचे दर वाढल्याचे कारण देत २०१७पासून शुल्क न वाढविल्याने आता बोर्डाने इयत्ता बारावीचे परीक्षा शुल्क २० रुपयांनी तर दहावीचे शुल्क ४५ रुपयांनी वाढविले आहे. ६ नोव्हेंबरनंतर परीक्षांचे अर्ज भरायला आणखी मुदतवाढ (application deadline) मिळेल, पण त्यासाठी जादा शुल्क आकारले जाणार आहे.

बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत ६ नोव्हेंबरपर्यंत आहे. यंदा इयत्ता दहावीसाठी राज्यातील अंदाजे १६ लाख तर बारावीसाठी १४ ते १५ लाख विद्यार्थी असतील, असा बोर्डाचा अंदाज आहे. परीक्षेसाठी राज्यात साडेपाच हजारांपर्यंत केंद्रे असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी भाषा विषय सोडून अन्य विषयांच्या दोन पेपरमध्ये किमान एक दिवसाचे अंतर ठेवले जाते.

(हेही वाचा – Kharkopar-Uran Railway: खारकोपर-उरण रेल्वेमार्गावर आठवडाभरात लोकल धावणार, रेल्वच्या पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात )

फेब्रुवारीअखेरीस सुरु झालेली बोर्डाची परीक्षा मार्चअखेरीस संपेल, असे सध्याचे नियोजन आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात दहावीचे २८० तर बारावीसाठी १९० परीक्षा केंद्रे असतील. नगर जिल्ह्यात दहावीसाठी १७९ तर बारावीसाठी १०८, सोलापूर जिल्ह्यात दहावीसाठी १७६ तर बारावीसाठी ११४ परीक्षा केंद्रे असणार आहेत.

बोर्ड परीक्षांचे नवीन शुल्क…

नियमित विद्यार्थी : ५०० रुपये

नियमित खासगी विद्यार्थी : ५०० रुपये

पुनर्परीक्षार्थी : ४८० रुपये

श्रेणी सुधार : ९२० रुपये

आयसोलेटेड विद्यार्थी : ५२० रुपये

प्रात्यक्षिक शुल्क : प्रति विषय १५ रुपये

‘एमसीव्हीसी’ प्रात्यक्षिक शुल्क : प्रति विषय ३० रुपये

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.