Supplementary Results 2023 : दहावी-बारावीच्या पुरवणी-परीक्षेचे निकाल जाहीर; लातूर विभाग प्रथम

118
Supplementary Results 2023 : दहावी-बारावीच्या पुरवणी-परीक्षेचे निकाल जाहीर; लातूर विभाग विभाग प्रथम

जे विद्यार्थी दहावी – बारावीच्या परीक्षेत (Supplementary Results 2023) नापास झाले आहेत, किंवा ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत, ज्यांना आपल्या गुणांच्या श्रेणीत सुधारणा करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून ही परीक्षा निकालानंतर काही महिन्यातच घेतली जाते. यंदाची परीक्षा ऑगस्ट महिन्यात झाली होती, ज्याचा निकाल आज म्हणजेच सोमवार २८ ऑगस्ट रोजी जाहीर झाला.

विद्यार्थ्यांना ‌www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (Supplementary Results 2023) मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट, तर माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा ९ आणि १० ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली होती.

(हेही वाचा – 10th, 12th Exam Date : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी – बारावी परीक्षेची तारीख ठरली)

राज्याचा दहावीचा निकाल (Supplementary Results 2023) २९.८६ टक्के लागला आहे. निकालात ५१.४७ टक्क्यांसह लातूर विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.

बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल ३२.१३ टक्के

बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची (Supplementary Results 2023) टक्केवारी ३२.१३ टक्के आहे. बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेला ६८ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी २२ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान घेण्यात आली होती. बारावी बोर्डाची पुरवणी प्रात्यक्षिक परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट आणि लेखी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधी दरम्यान पार पडली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.