या महिन्यात होणार १०वी, १२वीची परीक्षा!

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या तारखा घोषित झाल्यानंतर राज्यातील बोर्डाच्या परीक्षा केव्हा होणार याकडे सगळ्यांचा नजर लागल्या होत्या, शिक्षणमंत्री  वर्षा गायकवाड यांनी त्याची अखेर घोषणा केली. 

कोरोनामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. वर्षभर मुलांना घरात बसून अभ्यास करावा लागला, दुसरे वर्ष उजाडले तरी परीक्षांचा पत्ता नाही त्यामुळे वैतागलेल्या मुलांना हळूहळू आनंदाची बातमी मिळू लागली आहे. पहिल्यांदा हि आनंदाची बातमी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. १०वीची परीक्षा १ मेनंतर तर १२वीची परीक्षा  १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील, असे जाहीर केले आहे.

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे शाळांपासून, महाविद्यालये आणि सर्वच शिक्षण संस्थांवर परिणाम झाला आहे. त्यात परिस्थितीत हळूहळू पूर्ववत होत असल्याचे दिसत आहे. इयत्ता ५ ते इयत्ता ८ वीपर्यंत राज्य शालेय माध्यम शाळा या पुढील परिस्थितीवर ठरवण्यात येईल. सध्या नव्या स्टेंटची भीती असल्याकारणाने रूग्ण संख्या वाढते की कमी होते, परदेशात कोरोना नव्याने विषाणू याचा नेमका काय परिणाम होतो. याचा अंदाज घेऊनच इतर शालेय वर्ग सुरू करण्याचे ठरवण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

(हेही वाचा : टॉलिवूड नव्हे टल्लीवुड…)

दरम्यान ३१ डिसेंबर रोजी CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा ४ मे ते १५ जुलै या दरम्यान होईल, असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here