बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते २० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच बारावीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पुणे बोर्डाने त्यासंबंधीचे नियोजन अंतिम केले असून वेळापत्रक सर्व शाळा व महाविद्यालयांना पाठविले आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होईल. इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन पूर्ण करण्यासाठी २० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विषयांचे देखील प्रात्यक्षिक त्याचवेळी पार पडेल. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लेखी परीक्षा सुरु होणार आहे. प्रश्नपत्रिकांची संपूर्ण तयारी झालेसी असल्याचे बोर्डाने सांगितले आहे.
( हेही वाचा : शिर्डीत साई भक्तांसाठी पुन्हा मास्कसक्ती! मंदिर प्रशासनाने जारी केले नवे नियम…)
प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक
- १२ वी परीक्षा – १ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी
- अंदाजित परीक्षा केंद्र – ३ हजार
- अंदाजित परीक्षार्थी – १५ लाख
- दहावी – १० फेब्रुवारी ते १ मार्च
- परीक्षा केंद्र – ५ हजार
- एकूण अंदाजित परीक्षार्थी – १६ लाख
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा तेथे केंद्र याआधारे परीक्षा घेतल्या गेल्या परंतु आता कोरोनापूर्वी ज्या पद्धतीने परीक्षा व्हायची, त्याच केंद्रांवर परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणताही मानसिक ताण न घेता परीक्षांची तयारी करावी असे आवाहन पुणे बोर्डाने केले आहे.
Join Our WhatsApp Community