10th and 12th Supplementary Paper पुढे ढकलले: जाणून घ्या ‘या’ दिवशी होणार परीक्षा

125
10th and 12th Supplementary Paper पुढे ढकलले: जाणून घ्या ‘या’ दिवशी होणार परीक्षा
10th and 12th Supplementary Paper पुढे ढकलले: जाणून घ्या ‘या’ दिवशी होणार परीक्षा

मुंबईसह राज्यभरात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी काठालगतच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. शुक्रवारी (२६ जुलै) रोजी होणारी दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. (10th and 12th Supplementary Paper)

कधी होणार पेपर?

येत्या २६ जुलै (शुक्रवारी) रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग २ चा पेपर सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान नियोजित होता. मात्र, आता हा पेपर ३१ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान होईल. तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा वाणिज्य आणि संघटन व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, एमसीव्हीसी पेपर-२ हे तीन पेपर होते. हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीन पेपर आता ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. (10th and 12th Supplementary Paper)

(हेही वाचा – Parliament Session : सुनील तटकरे यांची प्रतिज्ञा; जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत…)

लोकल व वाहतूक सेवेवर परिणाम

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये शुकवार (२६ जुलै) रोजी मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि वाहतूक सेवावर परिणाम होऊ शकतो. म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळा बंद (School Closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोकणात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी (२५ जुलै) रोजी या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिला होते. तर इतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवायच्या का नाहीत ते त्या-त्या ठिकाणची परिस्थिती पाहून ठरवण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (10th and 12th Supplementary Paper)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.