१० वी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ३००० पदांसाठी भरती, येथे करा अर्ज

129

रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर अशी अनेक ट्रेडमध्ये ३ हजार हून अधिक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ईस्टर्न रेल्वेच्या er.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

( हेही वाचा : ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी! तब्बल ७८ दिवसांचा पगार बोनस देणार, ट्विटरद्वारे माहिती)

ईस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती २०२२ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ३० सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली असून पात्र उमेदवार २९ ऑक्टोबर किंवा यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. केवळ ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्जच स्वीकारले जाणार आहेत.

या पदांसाठी संधी

  • हावडा डिव्हिजन – ६५९ पदे
  • लिलुआ ऑफिस – ६१२ पदे
  • सियालदह डिव्हिजन – ४४० पदे
  • कांचरापाडा ऑफिस – १८७ पदे
  • मालदा डिव्हिजन – १३८ पदे
  • आसनसोल ऑफिस – ४१२ पदे
  • जमालपूर ऑफिस – ६६७ पदे

अर्ज कोण करू शकते?

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण केली असावी. तसेच NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्डर, शीट मेटल वर्कर, लाइनमन, वायरमन, सुतार आणि पेंटर यामध्ये ITI प्रमाणपत्र असावेत. उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २४ वर्षे असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जनरल, ओबीसी आणि EWS वर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आहे. तर एससी, एसटी, दिव्यांगासह सर्व वर्गाच्या महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.