दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ आधारे मिळणार सवलतीचे गुण!

131

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता सन २०२१-२२ या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे सवलतीचे गुण देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

अतिरिक्त सवलतीचे गुण

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतच्या सुधारित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे गुण मिळणार नाहीत अशी तरतूद आहे. तथापि, कोविड-१९ चा प्रादुर्भाव व त्यामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षी शासकीय रेखाकला परीक्षांचे आयोजन होऊ शकलेले नव्हते.

( हेही वाचा : घ्या… आता पाणीसुद्धा महागणार! असे असतील नवे दर )

सवलतीचे गुण देण्यास मान्यता

सन २०२०-२१ मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा आयोजित न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळू शकलेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी केवळ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे, त्यांना सन २०२१-२२ या वर्षापुरते सवलतीचे गुण देण्यास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

असा असेल परीक्षेचा कालावधी

प्रचलित पद्धतीनुसार बारावीची परीक्षा 20 फेब्रुवारी दरम्यान व दहावीची परीक्षा एक मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. तथापि चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. बारावीची लेखी परीक्षा चार मार्च 2022 ते 30 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 ते चार एप्रिल 2022 होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च यादरम्यान होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.